Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeसामाजिकखुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ८ एप्रिलपासून सर्वेक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ८ एप्रिलपासून सर्वेक्षण

नांदेड| खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राज्यभर व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात हे सर्वेक्षण ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या स्वायत्त संस्थेमार्फत अशा खुल्या प्रवर्गातील जाती-घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात, ज्यांना इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. युवक-युवतींसह सर्व वयोगटातील लाभार्थ्यांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे.

या सर्वेक्षणात सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा २५ जातींचा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणानंतर या यादीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अमृत संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व प्रगत कौशल्य प्रशिक्षण, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योगवृद्धीसाठी व्याज परतावा योजना अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि लक्षित गटाच्या गरजा समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत कुटुंबांची संख्या, त्यांची अपेक्षा, उपलब्ध कौशल्ये व स्थानिक संसाधनांचा अभ्यास करून भविष्यातील योजना आखण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमृतच्या लक्षित गटातील सर्वांनी सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनाल रोड, तरोडा नाका, नांदेड येथे संपर्क साधावा. या सर्वेक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!