Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कडक कारवाई

नांदेड| शहरातील चोरी व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 ते 7 एप्रिल पहाटे 2 वाजेपर्यंत हे ऑपरेशन पार पडले.

या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. नांदेड ग्रामीण , इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ यांसह कुंटूर, रामतीर्थ, सोनखेड, उस्माननगर, लिंबगाव आदी ठाण्यांनी संयुक्त कारवाई केली.

ऑपरेशनदरम्यान सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपी, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अनेक संशयितांची चौकशी करून काहींवर शस्त्र कायद्यान्वये (कलम 3/25, 4/25, 7/25) गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी छापे टाकून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, काही प्रकरणांत विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे. एकूण अनेक आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या व्यापक कारवाईसाठी विविध पथके तयार करून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनीही सक्रिय सहभाग घेत तपास मोहिमेला गती दिली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारची ऑपरेशन्स नियमितपणे राबवली जातील. गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.” या कारवाईमुळे नांदेड शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!