Tag: हिमायतनगर

हिमायतनगरात भूकंपाचा धक्का; घराच्या छताचा भाग कोसळला, अनर्थ टळला

हिमायतनगरात भूकंपाचा धक्का; घराच्या छताचा भाग कोसळला, अनर्थ टळला

महाराष्ट्र
हजरत उमर चौक परिसरातील घटना; नागरिकांमध्ये क्षणिक भीती हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात शनिवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा परिणाम हिमायतनगर शहरातही दिसून आला. हजरत उमर चौक परिसरातील अलकरीम मशिदीजवळील एका घराच्या छताचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहरातील अलकरीम मशिदीजवळील इंडिया वॉटर प्लांटजवळ राहणारे अब्दुल गफार अब्दुल जब्बार हे सकाळी झोपेत असताना सुमारे पावणे नऊ वाजताच्या सुमारास अचानक जमीन हलल्याचा अनुभव आला. त्याच वेळी जोराचा आवाज झाला आणि भूकंपाचा धक्का जाणवला. घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांच्या घराच्या छताचा काही भाग कोसळलेला दिसून आला. मात्र त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हिमायतनगर शहरातील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाण...
हिमायतनगर ते पोटा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग बनतोय अपघाताचा हाॅटस्पॉट

हिमायतनगर ते पोटा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग बनतोय अपघाताचा हाॅटस्पॉट

क्राइम
नांदेड–किनवट महामार्गावर दुहेरी बळी; अपघातांनी घेतला धोकादायक वळण सरसम परिसर पुन्हा हादरला; नागरिकांकडून रस्ता सुरक्षेवर प्रश्न हिमायतनगर| नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम इंदिरा नगर ते म्हसोबा नाल्याच्या मध्ये मोटरसायकल आणि एका अज्ञात वाहनामध्ये जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, लखन प्रदीप पांडे (वय 25, रा. सरसम) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अविनाश गणेश गोखले यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर रमेश गुंडेकर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर संबंध...
हिमायतनगर तालुक्यातील निकृष्ट कामांची पोलखोल होणार का?

हिमायतनगर तालुक्यातील निकृष्ट कामांची पोलखोल होणार का?

महाराष्ट्र, स्थानिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा नांदेड जिल्ह्यात सुरू असून, लवकरच समिती हिमायतनगर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, समिती या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य समोर आणणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पैंगनगा नदीवरील कोठा, घारापूर आदी ठिकाणी उच्च पातळी बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. तसेच जलसंधारण विभागाकडून कामारी, एकघरी, वडगाव परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत बंधारे उभारले जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे शासनाच्या विकासाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. याशिवाय ...
हिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!

हिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!

महाराष्ट्र, स्थानिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जमिनीचे प्लाॅट पाडून विक्री करणाऱ्या मालकांनी मुळ लेआऊट मध्ये दाखविलेले रस्ते ओपन स्पेस ही प्लाॅट पाडून त्याची विक्री केली आहे. परिणामी अनेक ओपन स्पेस आता गायब झाले आहेत. या बाबतीत संबंधित प्रशासनाची उदासीनता अश्या प्रकारच्या गैर प्रकारांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. रस्ते ओपन स्पेस दाखवून नगररचना कार्यालयाकडून लेआऊट मंजूर करून घ्यायचे आणी नंतर परस्पर फेरबदल करून रस्ते आणी ओपन स्पेस ची परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदा शहरात मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी केली. हिमायतनगर शहराची हद्दवाढ होवून आजूबाजूचा खुप मोठा भाग हा नगरपंचायतीच्या हद्दीत आलेला आहे. व तसेच शहराचे विस्तारीकरण ही वेगाने सुरू आहे. नवीन वसाहतीत अनेकांनी जमीनी विकत घेऊन त्याचे प्लाॅट पाडून ते विक्री...
हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

क्राइम
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौका-चौकांमध्ये तात्काळ CCTV कॅमेरे बसवावेत, अशी ठाम मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना तर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या संदर्भात मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम भाई खुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री ताडेवाड, नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब तसेच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. CCTV कॅमेरे बसविल्यास पोलिसांना तपासासाठी ठोस तांत्रिक पुरावे मिळतील. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांची ओळख पटेल आणि निर्दोष नागरिकांवर अन्याय होणार नाही.” मुख्यत्वे उमर चौक, आंबेडकर चौक...
हिमायतनगर : नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; अभियंता देशपांडे यांच्याकडून पाहणी

हिमायतनगर : नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; अभियंता देशपांडे यांच्याकडून पाहणी

राजकारण
हिमायतनगर (अनिल  मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूने सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीची अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी या कामात अंदाजपत्रकाला बगल देत दर्जाहीन काम होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार आज (दि. ९ एप्रिल) सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्री देशपांडे यांनी हिमायतनगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तक्रारदार वामनराव पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून नालीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, वामनराव पाटील यांनी यापूर्वी झालेल्या निकृष्ट कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते पूर्णपणे फ...
टाकराळा बु. येथे भीषण अपघात; जिप्सीला मागून धडक, 10 जण गंभीर जखमी

टाकराळा बु. येथे भीषण अपघात; जिप्सीला मागून धडक, 10 जण गंभीर जखमी

महाराष्ट्र
हिमायतनगर/वडगाव| तालुक्यातील टाकराळा बु. बस स्टॉपजवळ सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला. विवाह सोहळा आटोपून दरेगावकडे परतणाऱ्या जिप्सी टेम्पोला वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील एकाच कुटुंबातील सदस्य आंध्र प्रदेशातील निर्मल येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर टाकराळा बु. येथे त्यांच्या जिप्सी टेम्पोला मागून येणाऱ्या वीट भरलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेनंतर जिप्सी पलटी झाली, मात्र धडक देणाऱ्या टेम्पोने वेळीच ब्रेक न लावता सुमारे 40 ते 50 फूट वाहन फरफटत नेल्याने अपघाताचे गांभीर्य वाढले. या अपघातात महिलांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून एकूण 15 प्रवाशांपैकी 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक...
हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील उमरचौक परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हुसेन (वय 38, रा. उमरचौक, हिमायतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 8 एप्रिल 2026 बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमरचौक कमानजवळ ही घटना घडली. उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला “तु हमारे आदमी को पैसे मांगता क्या?” अशी धमकी देत शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी एकत्र येत चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी फिर्यादीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावावर व काकावरही जीवघेणे वार करण्यात आले, ज्यामुळे त...
हिमायतनगरच्या उमर चौकात रक्तरंजित हाणामारी

हिमायतनगरच्या उमर चौकात रक्तरंजित हाणामारी

क्राइम
हिमायतनगर| शहरातील उमर चौक परिसरात बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या भीषण भांडणाने परिसरात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्गालगत घडलेल्या या घटनेत तलवार व चाकूचा वापर करून एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. या रक्तरंजित हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दोन्ही बाजूकडील व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल होऊन एकमेकांविरुद्ध तक्रारी देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचेच हे गंभीर रूप असल्याची चर्च...
हिमायतनगरचा ऋतुराज सुवर्णकार MPSC मध्ये यशस्वी; पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती

हिमायतनगरचा ऋतुराज सुवर्णकार MPSC मध्ये यशस्वी; पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती

करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी सुनील वेदप्रकाश सुवर्णकार यांचे चिरंजीव ऋतुराज सुनील सुवर्णकार यांनी लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन करत संभाजीनगर पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती मिळवली आहे. मेहनतीचे फळ साध्या नोकरीत कार्यरत असलेल्या वडिलांनी मुलाला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवले. त्यानंतर ऋतुराज यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून खासगी नोकरी न करता MPSC ची तयारी करत शासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्णही केला. कुटुंबाचा मोठा वाटा ऋतुराज यांच्या यशामागे आजोबा वेदप्रकाश सुवर्णकार व आजी कमल सुवर्णकार यांचे मोठे योगदान असून, त्यांनी त्यांच्यासोबत राहून शिक्षणात मोलाची साथ दिली. खेळाडू कोट्यातून निवड शाफ्ट टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळावील असून, त्...
error: Content is protected !!