हिमायतनगरात भूकंपाचा धक्का; घराच्या छताचा भाग कोसळला, अनर्थ टळला

हजरत उमर चौक परिसरातील घटना; नागरिकांमध्ये क्षणिक भीती

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात शनिवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा परिणाम हिमायतनगर शहरातही दिसून आला. हजरत उमर चौक परिसरातील अलकरीम मशिदीजवळील एका घराच्या छताचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहरातील अलकरीम मशिदीजवळील इंडिया वॉटर प्लांटजवळ राहणारे अब्दुल गफार अब्दुल जब्बार हे सकाळी झोपेत असताना सुमारे पावणे नऊ वाजताच्या सुमारास अचानक जमीन हलल्याचा अनुभव आला. त्याच वेळी जोराचा आवाज झाला आणि भूकंपाचा धक्का जाणवला.

घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांच्या घराच्या छताचा काही भाग कोसळलेला दिसून आला. मात्र त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले.

oplus_0

दरम्यान, हिमायतनगर शहरातील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या चर्चा सोशल मीडियावरही पाहायला मिळाल्या. अनेक नागरिकांनी धक्का जाणवल्याचे सांगितले, मात्र शहरात अन्य ठिकाणी कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top