Tag: नांदेड

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रांसह एक जण ताब्यात

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रांसह एक जण ताब्यात

क्राइम
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करत तलवार व खंजरासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 17 एप्रिल रोजी मध्यरात्री हिलालनगर परिसरात छापा टाकला. यावेळी संशयास्पदरीत्या उभा असलेल्या इसमाची तपासणी केली असता, त्याच्याकडे लोखंडी तलवार व खंजर आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव शेख इरफान शेख इब्राहीम (वय 29, रा. पाकीजानगर, नांदेड) असे असून तो मजुरी करत असल्याची माहिती आहे. आरोपीकडून लोखंडी तलवार, लोखंडी खंजर, एकूण अंदाजे ₹700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 4/25 अंतर्गत गुन्हा क्रमांक 410/2026 नोंदविण्यात आला आहे., पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलक...
नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिर; २७ मुलींना लाभ

नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिर; २७ मुलींना लाभ

आरोग्य
नांदेड| मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले. शिवशक्तीनगर येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रमेश माने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश नारलावार होते, तर शीतल खांडील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत १४ ते १५ वर्षे वयोगटातील २७ मुलींना सुमारे ₹४५०० किंमतीची एचपीव्ही लस पूर्णपणे मोफत देण्यात आली. भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रेकरू संघ आणि मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभ...
नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अतुल सावे यांचा दोन दिवसीय दौरा

नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अतुल सावे यांचा दोन दिवसीय दौरा

सामाजिक
नांदेड| राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री Atul Save हे 17 व 18 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान ते माहूरगड येथे दत्त शिखर व रेणुकादेवी मंदिराचे दर्शन घेऊन परिसरातील विकास कामांची पाहणी करणार आहेत. तसेच माहूर विकास आराखड्याचे सादरीकरण आणि जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. आदिवासी उपयोजना संदर्भातही स्वतंत्र बैठक होणार आहे. 18 एप्रिल रोजी नांदेड येथे ओबीसी स्वयंरोजगार मेळाव्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था, बळीराजा शेती पाणंद रस्ते योजना तसेच विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. दौऱ्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. कॅप्टन आशिष दामले यांचा नांदेड दौरा परशुराम आर्थिक विक...
नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील MGR गार्डन फंक्शन हॉल परिसराच्या पाठीमागील इस्लामपुरा भागात साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे दुपारच्या वेळी मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. कडाक्याच्या उन्हात खेळताना ही मुले देगलूर नाका परिसरातील नाल्याजवळ पोहोचली. येथे मनपामार्फत सुरू असलेल्या कामासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने खेळता खेळता ही मुले खड्ड्यात पडली आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज (वय 10), मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (वय 13), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय 13), आयान इब्राहिम बागवान (वय 11...
नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका तरुणाच्या ताब्यातून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई इतवारा, नांदेड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 2026 अंतर्गत भा.ह.का. कलम 3/25, 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम ऊर्फ बबलुलाला आनंद लोखंडे (वय 22, रा. संघसेन नगर, इतवारा) हा अवैधरीत्या गावठी पिस्टल विक्रीसाठी बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पथकाने 15 एप्रिल 2026 रोजी संघसेन नगर परिसरात छापा टाकून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्य...
नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

क्राइम
११ जणांविरुद्ध गुन्हा, २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान जुगार अड्ड्यावर छापा टाकत ११ जणांविरुद्ध कारवाई केली असून, एकूण २ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ एप्रिल रोजी पहाटे माळटेकडी रोड परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 399/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले, तर काहींना ताब्यात घेण्यात आले. शेख अहमद शेख मिहीख, मोहम्मद नावीद मोहम्मद रफिक, सय्यद अथर, सय्यद अर्शद, फिरोज खान, अजहर खान व इतर (सर्व रा. नांदेड)   रोख रक्कम व जुगार साहित्य (पत्...
‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे १८ एप्रिलला नांदेडमध्ये उद्घाटन

‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे १८ एप्रिलला नांदेडमध्ये उद्घाटन

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आणि चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता नांदेड येथील सायन्स कॉलेज मधील स्व. पुरणमलजी लाहोटी सभागृहात होणार आहे. या महानाट्याचे उद्घाटन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते होणार असून ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. हैदराबाद येथील अभ्यूदय आर्टस् एकादमी प्रस्तुत या महानाट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची प्रभावी मांडणी हिंदी भाषेत करण्यात येणार आहे. या नाट्यात हैदराबादमधील २२ कलाकारांचा सहभाग असून त्यांनी देशभर विविध ठिकाणी प्रयोग सादर केले आहेत. या कार्यक्रमास सहयोग राशी कुपनधारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थि...
नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, “नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो; मात्र योग्य काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे. आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.” नागरिकांनी घ्यावयाची काळजी पुरेसे पाणी प्या : तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्या, बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा. पेयांचा वापर : लिंबू सरबत, ताक, लस्सी, ORS यांसारख्या पेयांचे सेवन करा. योग्...
नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान

शेती
डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येत आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना ‘मथुरा लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. हा सन्मान ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या 23 व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. नांदे...
नांदेडमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाच्या धाडी

नांदेडमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाच्या धाडी

क्राइम
नकली जर्दा प्रकरणाचा पर्दाफाश; जुगार अड्ड्यावर छापा, 7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने जिल्ह्यात धडक कारवाया करत अर्धापुर येथे नकली जर्दा बनविणाऱ्या इसमाचा पर्दाफाश केला, तर देगलूर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. अर्धापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर परिसरात सय्यद जाकीर ऊर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय 40) हा नकली सुगंधित जर्दा तयार करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या वेळी सुगंधित जर्दा, जर्दा तयार करण्याची मशीन, ग्लिसरीन व पॅराफिन असा एकूण 3,44,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कमी प्रतीच्या जर्द्यात रासायनिक पदार्थ मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने पॅकिंग करून विक्री करत असल्या...
error: Content is protected !!