
नांदेड| राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री Atul Save हे 17 व 18 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.


दौऱ्यादरम्यान ते माहूरगड येथे दत्त शिखर व रेणुकादेवी मंदिराचे दर्शन घेऊन परिसरातील विकास कामांची पाहणी करणार आहेत. तसेच माहूर विकास आराखड्याचे सादरीकरण आणि जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. आदिवासी उपयोजना संदर्भातही स्वतंत्र बैठक होणार आहे.


18 एप्रिल रोजी नांदेड येथे ओबीसी स्वयंरोजगार मेळाव्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था, बळीराजा शेती पाणंद रस्ते योजना तसेच विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. दौऱ्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.


कॅप्टन आशिष दामले यांचा नांदेड दौरा
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष Ashish Damle हे 17 एप्रिल रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नांदेड यांच्या वतीने आयोजित ‘परशुराम तेजोत्सव’ अंतर्गत प्रखर हिंदुत्व कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम कुसूम सभागृह येथे सायंकाळी पार पडणार असून त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
