Tag: हिमायतनगर

हिमायतनगरात रेती-मुरूम माफियांचा उच्छाद; महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

हिमायतनगरात रेती-मुरूम माफियांचा उच्छाद; महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

क्राइम
अधिकृत ठेकेदारांना अडचणीत आणण्याचे व बेकायदा लोकांना अभय देण्याचा प्रताप सुरु..! हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर सुरू असलेल्या अवैध रेती आणि गायरान जमीन, तलावातून केल्या जाणाऱ्या मुरूम उत्खननाने अक्षरशः उच्छाद मांडला असून कोठा, धानोरा, वारंगटाकळी, विरसणी, खडकी, पिचोंडी परिसरात रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडपणे चालू आहे. विशेष म्हणजे कोणताही परवाना किंवा लिलाव नसताना हा व्यवसाय सुरू असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज डझनावारी ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे रेती-मुरूमाची खुलेआम ने-आण होत असूनही संबंधित यंत्रणा ‘बघ्याची भूमिका’ घेत असल्याचा आरोप आहे. पोलीस व महसूलच्या या बोटचेपी कारभारामुळे शासनाचा लाखो-कोट्यव...
हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

धर्म अध्यात्म
संगीतमय भागवत व गणेश पुराण कथेमुळे भक्तिमय वातावरण हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार)  तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर (वाढोणा) येथे पवित्र अधिकमास (धोंड्याचा महिना) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भव्य संगीतमय भागवत कथा ह.भ.प. वैष्णवी दिदी गोड सोनखेडकर यांच्या मधुर वाणीने दिनांक २३ मे ते २९ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे. यानंतर ३० मे रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात भव्य संगीतमय गणेश पुराण कथा ह.भ.प. सुनिल महाराज आष्टीकर (सेलू) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ जून ते ११ जून २०२६ दरम्यान दुपारी २ ते ५ या व...
हिमायतनगरात परमेश्वर शिंदे यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार; वीज सेवेसाठीच्या कार्याचा गौरव

हिमायतनगरात परमेश्वर शिंदे यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार; वीज सेवेसाठीच्या कार्याचा गौरव

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता अहोरात्र झटणारे परमेश्वर शिंदे यांच्या प्रामाणिक व निष्ठावंत कार्याचा गौरव करत राज्य मराठी पत्रकार परिषदेतर्फे त्यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या हस्ते लाईनमन श्री परमेश्वर शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तत्पर राहून सेवा देणाऱ्या शिंदे यांच्या कार्याची शहरात विशेष दखल घेतली जात आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केल...
हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

महाराष्ट्र, सामाजिक
लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणारी वामन पाटील यांची पोस्ट चर्चेत हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वॉर्डमध्ये अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आमदार-खासदार यांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करत “जनतेची सेवा करण्यासाठीच आपणास निवडून दिले आहे; कृपया जबाबदारीची जाणीव ठेवा,” अशी साद त्यांनी घातली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा ...
हिमायतनगर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सोनारी केंद्र ठरले लक्षवेधी

हिमायतनगर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सोनारी केंद्र ठरले लक्षवेधी

करियर
केंद्र संचालक सतीश गोपतवाड यांच्या संकल्पनेतून ‘पिंक सेंटर’ उपक्रम हिमायतनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेली इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी हिमायतनगर तालुक्यात अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व सुरळीत वातावरणात पार पडली. या परीक्षेदरम्यान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनारी येथील केंद्राने ‘पिंक परीक्षा केंद्र’ या अनोख्या संकल्पनेमुळे विशेष लक्ष वेधून घेतले. शिक्षण विभाग, पंचायत समिती हिमायतनगर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी असलेल्या या केंद्रावर सर्व महिला पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी केशवराव मेकाले यांच्या प्रेरणेतून आणि केंद्रप्रमुख गणेश कोकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक सतीश गोपतवाड यांनी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात ...
हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; आयशर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एक ठार तर एक गंभीर

हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; आयशर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एक ठार तर एक गंभीर

महाराष्ट्र
हिमायतनगर| हिमायतनगर -सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयचर ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला आहे. या घटनेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. हिमायतनगर शहरातील शासकीय धान्य गोदामातून मौजे कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH26-7776 ने सिरपल्ली–सिरंजनी मार्गे येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH29-AZ 4538 ला जोरदार धडक दिली. ही घटना एचपी गॅस गोडाऊनसमोर मुख्य रस्त्यावर घडली. या अपघातात दुचाकिवरील गणेश सदाशिव जाधव वय 55 वर्ष राहणार सिरपल्ली जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील शंकर विठ्ठल वानखेडे वय 40 वर्ष रा सिरपल्ली हि व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अपघात एवढा भयंकर होता की आयचर ट्रकच्या समोरील भागात दुचाकी अडकल्याचे घटनास्थळी दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णाल...
हिमायतनगरमध्ये जुन्या ग्रामपंचायत इमारतीला ‘डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ नाव देण्याची मागणी

हिमायतनगरमध्ये जुन्या ग्रामपंचायत इमारतीला ‘डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ नाव देण्याची मागणी

सामाजिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जुन्या ग्रामपंचायत इमारतीचे नामकरण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करून तेथे सांस्कृतिक सभागृह, वाचनालय व अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी समाज विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गंगाधर मामीडवार सावकार यांनी दान दिलेल्या जागेत १९९० ते १९९५ या कालावधीत समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. या ठिकाणी सर्व समाजासाठी सार्वजनिक वाचनालयही सुरू करण्यात आले होते. नंतर हिमायतनगर येथे न्यायालयास मंजुरी मिळाल्यानंतर जागेअभावी हे समाजमंदिर ग्रामपंचायत कार्यालयासाठी वापरण्यात आले. त्यामुळे वाचनालय बंद पडले. आता नगरपंचायत कार्यालय अन्यत्र स्थलांतरित झाल्याने ही इमारत पुन्हा समाजाच्या उपयोगासाठी उपलब...
हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनास निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष व प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने वारंवार आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत, दि. २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा...
नारीशक्तीच्या सन्मानासाठी हिमायतनगरात शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसविरोधी आंदोलन

नारीशक्तीच्या सन्मानासाठी हिमायतनगरात शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसविरोधी आंदोलन

राजकारण
हिमायतनगर | महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व सहयोगी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात “नारीशक्ती के सन्मान में शिवसेना मैदान में” व “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. शितलताई भांगे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले, मात्र काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांनी त्यास विरोध केल्याने महिलांच्या हक्कांना बाधा पोहोचत आहे. हे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे आंदोलन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा संपर्क...
विठ्ठलराव संभाजी हरडफकर यांचे निधन; आज अंत्ययात्रा

विठ्ठलराव संभाजी हरडफकर यांचे निधन; आज अंत्ययात्रा

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक कै. विठ्ठलराव संभाजी हरडफकर (कदम) यांचे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरातून श्री संभाजी राजे हॉस्टेल येथून निघणार असून, अंत्यसंस्कार वैैकुंठधाम स्मशानभूमी, लकडोबा चौक, हिमायतनगर येथे करण्यात येणार आहेत. स्व. विठ्ठलराव हरडफकर यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार असून, त्यांच्या निधनाने समाजातील एक जेष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐...
error: Content is protected !!