Tag: हिमायतनगर

खतांच्या जादा दराला लगाम; हिमायतनगर कृषी विभागाच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा

खतांच्या जादा दराला लगाम; हिमायतनगर कृषी विभागाच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा

शेती, स्थानिक
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठपुरावा युरिया ₹266 तर डीएपी ₹1350 दराने उपलब्ध करण्याचे आदेश शेतकऱ्याकडून जादा वसुली सहन केली जाणार नाही हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात खतांच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असताना कृषी विभागाने बुधवारी अखेर हस्तक्षेप करत विक्रेत्यांना शासनाने निश्चित केलेल्या दराने खत विक्री करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती. दि. ३ जून बुधवारी रोजी सकाळपासून अनेक शेतकऱ्यांनी खतांच्या जादा दराबाबत तक्रारी केल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खत विक्रेत्यांशी बैठक घेऊन शासनमान्य दराने खत उपलब्ध क...
हिमायतनगर येथील चम्पालालजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण

हिमायतनगर येथील चम्पालालजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक व श्रीश्रीमाल परिवारातील आदरणीय व्यक्तिमत्त्व श्रीमान सुश्रावक चम्पालालजी मिश्रीमलजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण झाल्याची दुःखद वार्ता समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कारासाठी चलावा (अंतिम यात्रा) सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या गणेश मंदिर परिसरातील निज निवासस्थान, हिमायतनगर येथून निघणार असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली आहे. दिवंगत आत्म्यास शांती लाभो व मोक्षमार्गाची उत्तम गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. ते वर्धमान मेन्स वेयर चे संचालक आशिष जैन, सुमित जैन यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात तख्तमल, महावीरचंद, शांतिलाल, अमरचंद, राजवर्धन, त्रिलोकचंद, आशीष, सुमित, समकित तसेच समस्त श्रीश्रीमाल परिवार असा मोठा परिवार आह...
हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता हेंद्रे (ढेकळे) यांचे गुरुवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात व समाजबांधवांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दत्ता हेंद्रे यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने माळी समाजासह हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, नातू, पंतू असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 29 मे रोजी दुपारी 12 वाजता हिंदू स्मशान भूमी, लाकडोबा चौक, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
हिमायतनगर येथील ज्येष्ठ कृषी व्यापारी रामराव पाटील सुर्यवंशी यांच्या पत्नीचे दुःखद निधन

हिमायतनगर येथील ज्येष्ठ कृषी व्यापारी रामराव पाटील सुर्यवंशी यांच्या पत्नीचे दुःखद निधन

सामाजिक
हिमायतनगर| हिमायतनगर येथील ज्येष्ठ कृषी व्यापारी रामराव पाटील सुर्यवंशी यांच्या धर्मपत्नी स्व. विमलबाई रामराव सुर्यवंशी यांचे गुरुवार दि. 28 मे रोजी रात्री 9 वाजता आदिलाबाद येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पती रामराव पाटील सुर्यवंशी, तीन मुलं, एक मुलगी, दोन सुना, नातू असा मोठा परिवार आहे. स्व. विमलबाई सुर्यवंशी यांच्यावर आज दि. 29 मे 2026 रोजी दुपारी 12.10 वाजता हिंदू शमशान भूमी, लकडोबा चौक, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुर्यवंशी परिवारावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
हिमायतनगर कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार?; तीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी एकही प्रभावी मार्गदर्शन शिबिर नाही!

हिमायतनगर कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार?; तीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी एकही प्रभावी मार्गदर्शन शिबिर नाही!

शेती
कागदावर शिबिरे, प्रत्यक्षात शेतकरी अंधारात; लाखोंच्या निधीच्या खर्चावर संशय, वामनराव पाटील वडगांवकर यांनी केली चौकशीची मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| एकीकडे शासन “शेतकरी समृद्धी”चे गोडवे गात असताना दुसरीकडे हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या कथित निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच अडचणीत सापडल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी तहसीलदार व संबंधित कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना पीक नियोजन, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण व शासन योजनांबाबत मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. मात्र, मागील तीन वर्षांत हिमायतनगर शहरात एकही प्रभावी कृषी कार्यशाळा किंवा मार्गदर्शन शिबिर न झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाकडून खरीप ...
हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

शेती, राजकारण
स्टॉक असूनही “खत संपले”चा फलक; कृषी विभागाच्या भूमिकेवर वडगांवकर यांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत असून, काही कृषी सेवा केंद्रांकडून खत साठा लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या नावावरील खताचा स्टॉक मित्र, नातेवाईक व इतर व्यक्तींच्या आधार कार्डवर OTP घेऊन ‘स्कॅन’ करून उडवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी बांधवांत रंगू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमायतनगर शहरातील अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकरी खत मागण्यासाठी गेल्यास “स्टॉक संपला” असे सांगितले जाते. मात्र, शहर व ग्रामीण परिसरातील काही खासगी गोडाऊनमध्ये DAP, युरिया, 10:26:26 आणि पोटॅश खतांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्...
हिमायतनगरच्या कन्येचा पुण्यात डंका; ‘नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ने श्रीमयी सूर्यवंशी सन्मानित

हिमायतनगरच्या कन्येचा पुण्यात डंका; ‘नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ने श्रीमयी सूर्यवंशी सन्मानित

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| छोट्याशा हिमायतनगर शहरातून मोठी झेप घेत सोशल मीडियाच्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रीमयी शितल श्रीनिवास सूर्यवंशी हिने पुन्हा एकदा आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. आपल्या अप्रतिम नृत्यकला, मनमोहक हावभाव आणि आकर्षक सादरीकरणाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हिमायतनगरच्या या कन्येचा पुण्यात एका भव्य सोहळ्यात सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध माध्यम समूह ‘नवभारत-नवराष्ट्र’ यांच्या वतीने पुण्यातील पंचतारांकित हॉटेल हयात रीजन्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर समिट २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात श्रीमयीला मानाचा ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे हिमायतनगरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रीमयी सूर्यवंशी हिने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ड...
प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप

प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप

शेती
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यात खत वितरणावरून शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोनच पोती खत द्यावे” असा आदेश खत विक्रेत्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ एकर शेती असो किंवा १० ते २० एकर शेती असलेला शेतकरी असो, सर्वांना समान प्रमाणात केवळ दोनच पोती खत देणे अन्यायकारक आहे. “जमीन जास्त, पीक जास्त आणि गरज जास्त असताना खत मात्र समान कसे?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार खत वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी Farmer ID आणि नियंत्रण प्रणाली लागू करण्याबाबत हालचाली...
हिमायतनगरातील भारतबाई मादसवार यांचे निधन: बासर येथे गोदावरीत अस्थीविसर्जन

हिमायतनगरातील भारतबाई मादसवार यांचे निधन: बासर येथे गोदावरीत अस्थीविसर्जन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील बजरंग चौक परिसरातील रहिवासी भारतबाई नरसिंगा मादसवार यांचे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी कुटुंबीयांनी बासर येथे पवित्र गोदावरी नदीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. भारतबाई मादसवार या प्रेमळ, शांत स्वभावाच्या आणि कुटुंबवत्सल म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे मादसवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्या सहशिक्षक धर्मपुरी मादसवार यांच्या मातोश्री तर पत्रकार अनिल मादसवार यांच्या काकू होत्या....
हिमायतनगर तालुक्यात डिझेल टंचाईचे संकट; पेरणीपूर्वी शेतकरी चिंतेत

हिमायतनगर तालुक्यात डिझेल टंचाईचे संकट; पेरणीपूर्वी शेतकरी चिंतेत

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर होत असून, याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर असताना ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि मशागतीची कामे डिझेलअभावी ठप्प होण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता डिझेल टंचाईचे नवे आव्हान उभे राहिले आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी त्रस्त असताना आवश्यक इंधन उपलब्ध होत नसल्याने अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. याबाबत युवा शेतकरी श्रीदत्त पवार पाटील सोनारीकर यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधत डिझेल पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “बळीराजा जगला तरच देश जगेल,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सोशल मीडिया...
error: Content is protected !!