
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यात खत वितरणावरून शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोनच पोती खत द्यावे” असा आदेश खत विक्रेत्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ एकर शेती असो किंवा १० ते २० एकर शेती असलेला शेतकरी असो, सर्वांना समान प्रमाणात केवळ दोनच पोती खत देणे अन्यायकारक आहे. “जमीन जास्त, पीक जास्त आणि गरज जास्त असताना खत मात्र समान कसे?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.


कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार खत वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे.


दरम्यान, राज्यात खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी Farmer ID आणि नियंत्रण प्रणाली लागू करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे समोर येत आहे. “जितकी जमीन तितके खत” या तत्त्वावरही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


याबाबत कृषी विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आणि खातासाठी होणारी शेतकऱ्यांची हेळसांड दूर होने अपेक्षित असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या मागण्यांकडे प्रशासन काय.? भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील युवा शेतकरी श्रीदत्त पवार पाटील सोनारीकर यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधत डिझेल पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “बळीराजा जगला तरच देश जगेल,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही त्यांच्या या मागणीला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी व नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
