करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करून नवीन इमारती उभाराव्यात; मूलभूत सुविधा देण्याची मागणी

मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करून नवीन इमारती उभाराव्यात; मूलभूत सुविधा देण्याची मागणी

करियर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन नायगाव | नायगाव तालुक्यातील मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून जीर्ण व धोकादायक इमारतींच्या जागी नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारती मंजूर कराव्यात तसेच शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे (मांजरमकर) यांनी गटविकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मांजरम येथील काही अंगणवाड्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत वापरण्यास अयोग्य झाली आहे. त्यामुळे लहान बालकांना पर्यायी ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर, बसण्याची व्यवस्था, स्...
सर्वाह व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२६ चे अंतिम निकाल जाहीर; सर्वाह फाउंडेशन दिनानिमित्त १० संघांची अंतिम निवड

सर्वाह व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२६ चे अंतिम निकाल जाहीर; सर्वाह फाउंडेशन दिनानिमित्त १० संघांची अंतिम निवड

करियर
नवीन नांदेड| सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशन आणि श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था (एस.जी.जी.एस. आय.ई.अँड टी.), नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वाहच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सर्वाह “व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम (VDP) २०२६” अंतर्गत अंतिम फेरीतील स्टार्टअप संघांची घोषणा करण्यात आली. एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी. नांदेड च्या माजी विद्यार्थ्यांच्या (Alumni) सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून संस्थेमध्ये “नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप” संस्कृतीला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या कार्यक्रमास एस.जी.जी. एस. आय.ई. अँड टी. च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष श्री. प्रशांत पौळ तसेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य व संस्थेचे माजी विद्यार्थी अमोल महामुनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशनचे अध्यक्ष व सं...
शोभानगरातील डॉ. शंकरराव चव्हाण स्टडी पॉईंटचा सीसीटीव्ही डिस्प्ले महिनाभरापासून बंद

शोभानगरातील डॉ. शंकरराव चव्हाण स्टडी पॉईंटचा सीसीटीव्ही डिस्प्ले महिनाभरापासून बंद

करियर
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने दुरुस्ती करून अतिरिक्त डिस्प्ले बसविण्याची मागणी नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड शहरातील शोभानगर परिसरात नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने सुरू असलेल्या स्टडी पॉईंटमध्ये विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे. अभ्यासासाठी शांत, शिस्तबद्ध आणि पोषक वातावरण उपलब्ध असल्याने या स्टडी पॉईंटकडे विशेषतः मुलींचा मोठा ओढा वाढला आहे. मात्र, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला येथील सीसीटीव्ही यंत्रणेचा डिस्प्ले तब्बल एक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून, या गंभीर बाबीकडे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शोभानगर परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण स्टडी पॉईंट हा परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अभ्यासाचे मह...
मराठी ही रोजगाराभिमुख भाषा; विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित करावे : राम तरटे

मराठी ही रोजगाराभिमुख भाषा; विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित करावे : राम तरटे

करियर
यशवंत महाविद्यालयातील उद्घोधन वर्गात मार्गदर्शन; 'बारा आण्याची बोंब' कथाकथनाने रंगली मैफल नांदेड | मराठी भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून पत्रकारिता, कथालेखन, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, आशयलेखन (कंटेंट रायटिंग), माध्यम क्षेत्र तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणारी भाषा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी केले. यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात आयोजित उद्घोधन वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. राम तरटे यांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयातील करिअरच्या विविध संधींची सविस्तर माहिती देत, पत्रकारिता, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, माध्यम क्षेत्र आणि आशयलेखनात मराठी जाणकारांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सा...
बेटक बिलोली जि.प. शाळेचे शिक्षक आयुबखान पठाण यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा उत्साहात

बेटक बिलोली जि.प. शाळेचे शिक्षक आयुबखान पठाण यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा उत्साहात

करियर
हिमायतनगर, प्रतिनिधी| बेटक बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आयुबखान चाँदखान पठाण हे ३१ जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींच्या वतीने सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा १ ऑगस्ट रोजी नरसी येथील आदित्य गार्डन (फंक्शन हॉल) येथे उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला प्रकाश पाटील भिलवंडे, सरपंच सौ. सविताताई राहुल पाटील नकाते, शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव ढगे, केंद्रप्रमुख उमाकांत डिंगणे, केंद्रप्रमुख कपिलेश्वर नलबलवार, वीरभद्र मिरेवाड, मंगनाळे, राहुल पाटील नकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सदस्य सुरेश पवार, रामकिशन पवार, गजानन नकाते, माजी चेअरमन माणिकराव भरकांड तसेच पोलीस पाटील भागवत पाटील भ...
RRB परीक्षार्थ्यांसाठी दिलासा; जालना–रायचूर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल डबे

RRB परीक्षार्थ्यांसाठी दिलासा; जालना–रायचूर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल डबे

करियर
1 ते 7 ऑगस्टदरम्यान वाढीव सुविधा; परीक्षार्थ्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय नांदेड, प्रतिनिधी| रेल्वे भरती बोर्ड (RRB) परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गाडी क्रमांक 17663/17664 जालना–रायचूर–जालना एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल सेकंड क्लास (GS) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. 17663 (जालना–रायचूर) ला 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत जालना येथून सुटणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये दोन अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत. तसेच गाडी क्र. 17664 (रायचूर–जालना) ला 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत रायचूर येथून सुटणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये हे अतिरिक्त डबे उपलब्ध असतील. आरआरबी परीक्षार्थ्यांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुव...
राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंगमध्ये स्वारातीम विद्यापीठ देशात १२ व्या क्रमांकावर; ९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’

राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंगमध्ये स्वारातीम विद्यापीठ देशात १२ व्या क्रमांकावर; ९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’

करियर
नांदेड|  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (स्वारातीम) राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग (NGUR) २०२६ मध्ये देशात १२ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यापीठाला १०० पैकी ९२.५ गुण मिळाले असून 'गोल्ड रेटिंग' प्राप्त झाली आहे. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसह देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये हे यश मिळविल्याने विद्यापीठाच्या शाश्वत विकास उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या यशामुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या '10th NYC Green School Conference 2026' मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी निमंत्रण मिळाले आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांमध्ये या क्रमवारीत स्थान मिळविणारे स्वारातीम हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे. पर्यावरणीय प्रशासन, जैवविविधता, कार्बन व हवामान कृती, हरित पायाभूत सुविधा, ऊर्जा कार्यक्षमता, जलव्यवस्थापन, क...
वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर
नांदेड | रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आयोजित विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. "वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून सुरक्षित वाहतूक ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच रस्ता सुरक्षेचे नियम अंगीकारून जबाबदार नागरिक बनावे," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळेतील विज्ञान विभा...
आषाढी एकादशीनिमित्त सवना जिल्हा परिषद शाळेत भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा अनोखा संगम

आषाढी एकादशीनिमित्त सवना जिल्हा परिषद शाळेत भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा अनोखा संगम

करियर
हिमायतनगर, प्रतिनिधी| आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सवना ज. येथे 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत भक्ती, संस्कार आणि अनुभवाधारित शिक्षणाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय झाला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानदिंडी काढत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या विचारांचा जागर केला. अभंग गायन, भजन, संतवाणी, नामस्मरण आणि संतांच्या जीवनकार्याचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला. "विठ्ठल विठ्ठल" आणि "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषाने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती,...
कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय क्षेत्रासाठी ठरणार वरदान; शैक्षणिक प्रायमर कार्यक्रम संपन्न

कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय क्षेत्रासाठी ठरणार वरदान; शैक्षणिक प्रायमर कार्यक्रम संपन्न

करियर
"Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine" नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच Association of Physicians of India (API), Nanded यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या पुढाकाराने "Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine " या विषयावरील शैक्षणिक प्रायमर कार्यक्रमाचे आयोजन २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ यावेळेमध्ये महाविद्यालयातील पी.एस.एम. लेक्चर हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षक, तज्ज्ञ डॉक्टर, ज्येष्ठ चिकित्सक, एम.बी.बी.एस. (UG) विद्यार्थी, इंटर्न (Intern) विद्यार्थी, पदव्युत्तर (PG) विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी "Al in Medical Practice" या विषयावर ...
error: Content is protected !!