करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नीट (यूजी) 2026 परीक्षार्थ्यांची वैद्यकीय तपासणी; नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

नीट (यूजी) 2026 परीक्षार्थ्यांची वैद्यकीय तपासणी; नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

करियर
नांदेड | नीट (यूजी)-2026 प्रवेश परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून, परीक्षार्थ्यांची वैद्यकीय तपासणी (ENT) करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ब्लूटूथ यांसारख्या प्रतिबंधित वस्तूंचा वापर रोखण्यासाठी ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली मार्फत आयोजित ही परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 46 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यापैकी 24 केंद्रे शहरात तर 22 केंद्रे ग्रामीण भागात आहेत. सर्व परीक्षार्थ्यांनी सकाळी 11 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत तपासणी प्रक्रिया पार पडणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग वापरला जाऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक उ...
पीएच.डी. कोर्सवर्क (Backlog) परीक्षा उन्हाळी–२०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

पीएच.डी. कोर्सवर्क (Backlog) परीक्षा उन्हाळी–२०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पीएच.डी. कोर्सवर्कमध्ये अनुत्तीर्ण (Backlog) राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी–२०२६ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. सदर परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार ऑफलाईन व लेखी (Pen & Paper) स्वरूपात घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा अर्ज त्यांच्या संबंधित संशोधन केंद्र किंवा संकुलामार्फत सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ₹३१०/- इतके निश्चित करण्यात आले असून अर्ज स्वीकृतीचा कालावधी ४ मे ते ७ मे २०२६ असा आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२६ आहे. तसेच संशोधन केंद्रांनी अर्ज व शुल्कासह कागदपत्रे परीक्षा विभागाकडे ११ मे २०२६ पर्यंत सादर करावीत. शुल्क भरण्यासाठी धनादेश, ...
नांदेड एज्युकेशन सोसायटी व दयानंद शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक करार

नांदेड एज्युकेशन सोसायटी व दयानंद शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक करार

करियर
नांदेड | मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे. आता या संस्थेने लातूरमधील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेसोबत भागीदारी करत विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या करारामुळे सायन्स महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. दोन्ही संस्थांमध्ये अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. सोमवारी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेला भेट देऊन त्यांच्या शै...
‘वॉटर बेल’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय

‘वॉटर बेल’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय

करियर
नांदेड| उन्हाळ्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी नियमित पाणी प्यावे यासाठी शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा ‘वॉटर बेल’ वाजविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने जवळा येथील शाळेने पुढाकार घेत हा उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी शाळेच्या वेळापत्रकात सकाळी 8.30, 9.30 आणि 10.30 वाजता पाणी पिण्यासाठी वेळ निश्चित केला आहे. या वेळी सर्व विद्यार्थी एकत्र येऊन पाणी पितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागण्यास मदत होत आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास थकवा,...
हिमायतनगर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सोनारी केंद्र ठरले लक्षवेधी

हिमायतनगर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सोनारी केंद्र ठरले लक्षवेधी

करियर
केंद्र संचालक सतीश गोपतवाड यांच्या संकल्पनेतून ‘पिंक सेंटर’ उपक्रम हिमायतनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेली इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी हिमायतनगर तालुक्यात अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व सुरळीत वातावरणात पार पडली. या परीक्षेदरम्यान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनारी येथील केंद्राने ‘पिंक परीक्षा केंद्र’ या अनोख्या संकल्पनेमुळे विशेष लक्ष वेधून घेतले. शिक्षण विभाग, पंचायत समिती हिमायतनगर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी असलेल्या या केंद्रावर सर्व महिला पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी केशवराव मेकाले यांच्या प्रेरणेतून आणि केंद्रप्रमुख गणेश कोकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक सतीश गोपतवाड यांनी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात ...
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी राम तरटे

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी राम तरटे

करियर
नांदेड| नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयक पदाच्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी ही घोषणा केली. राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर समिती अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याअंतर्गत नव्या नियुक्त्या व रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रवी संगनवार यांची नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा निमंत्रक प्रदीप नागपूरकर आणि समन्वयक राम तरटे यांनी जिल्ह्यातील संघटना अधिक सक्षम करण्यासाठी वेळ द्यावा, अशी सूचना राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केली आहे. या नियुक्तीबद्दल राम तरटे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे....
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा

करियर
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये विलियम शेक्सपियर यांच्या जयंती निमित्त जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्त यांच्या मार्गदर्शनाखाली २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आंला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल बोंबले राजू यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागाचे प्रा. एम पी गुंडाळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. एम. पी. गुंडाळे यांनी विलियम शेक्सपियर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला त्यांच्या ग्रंथ संपदा विषयी तसेच त्यांच्या साहित्या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल बोंबले राजू यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त मान्यवरांना ग्रंथ भेट दिली व युनिस्को द्वारे १९९५ रोजी जागतिक पुस्तक द...
जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना पुस्तकांचे तोरण; जवळा शाळेचा अनोखा उपक्रम

जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना पुस्तकांचे तोरण; जवळा शाळेचा अनोखा उपक्रम

करियर
नांदेड, प्रतिनिधी| जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील जवळा (दे.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परिसरातील झाडांना पुस्तकांचे तोरण बांधून “मुक्त बाल वाचनालय” सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. परीक्षेनंतरच्या कालावधीत दररोज सकाळी दोन तास विद्यार्थी झाडांच्या सावलीत बसून विविध पुस्तके वाचत आहेत. वाचनानंतर विद्यार्थी पुस्तके पुन्हा त्यांच्या जागी ठेवतात. या उपक्रमात गोष्टींची पुस्तके, थोर व्यक्तींची चरित्रे, शूरवीरांच्या कथा तसेच वैज्ञानिक विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळेतील सुमारे दहा झाडांवर अशा पुस्तकांचे तोरण बांधण्यात आले आहे. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संगिता बडवणे, उमाक...
40° तापमानात दिव्यांग विद्यार्थ्यांशी खेळ? आदेश धाब्यावर; शेवटच्या ४–५ दिवसांतच सकाळ सत्र सुरू

40° तापमानात दिव्यांग विद्यार्थ्यांशी खेळ? आदेश धाब्यावर; शेवटच्या ४–५ दिवसांतच सकाळ सत्र सुरू

करियर
नांदेड | जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. 05 मार्च 2026 रोजी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा स्पष्ट आदेश असतानाही काही दिव्यांग शाळांनी तब्बल दीड महिना त्याची अंमलबजावणी न केल्याचे उघड झाले आहे. परिणामी 40 अंशांपेक्षा जास्त तापमानात विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात शिक्षण घ्यावे लागले. नांदेडमधील मालपाणी मूकबधिर विद्यालय, मगनपुरा येथे दीर्घकाळ शाळा दुपारच्या सत्रातच सुरू ठेवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यामुळे वस्तीगृहातील तसेच ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. विशेष म्हणजे शिक्षक व कर्मचारी वर्गालाही तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. दरम्यान, सकाळ सत्र सुरू करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडे विनंती केली असता, त्यांना अपमानास्पद वागणू...
एस.जी.जी.एस. विष्णुपुरीत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन सत्र; तणाव व्यवस्थापनावर भर

एस.जी.जी.एस. विष्णुपुरीत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन सत्र; तणाव व्यवस्थापनावर भर

करियर
नवीन नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी येथे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा तणाव लक्षात घेऊन वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेक्टर डॉ. अंकुश सावरकर व वसतिगृह प्रशासनाच्या वतीने २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कृष्णा मेस रिक्रिएशन हॉल येथे तसेच रात्री ९.३० वाजता नंदगिरी बॉईज हॉस्टेलमध्ये मार्गदर्शन सत्र पार पडले. या कार्यक्रमात देवगिरी, नंदगिरी आणि गोदावरी वसतिगृहातील एकूण ६५० मुली व २१५ मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सत्रात विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण-तणाव व्यवस्थापन आणि वसतिगृह स्वच्छतेचे महत्त्व या दोन प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण...
error: Content is protected !!