हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा

हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये विलियम शेक्सपियर यांच्या जयंती निमित्त जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्त यांच्या मार्गदर्शनाखाली २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आंला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल बोंबले राजू यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागाचे प्रा. एम पी गुंडाळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. एम. पी. गुंडाळे यांनी विलियम शेक्सपियर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला त्यांच्या ग्रंथ संपदा विषयी तसेच त्यांच्या साहित्या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल बोंबले राजू यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त मान्यवरांना ग्रंथ भेट दिली व युनिस्को द्वारे १९९५ रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण सांगितले की, जर आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करील, तर पुस्तक हे तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल.

प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गुंडाळे यांनी प्रत्येकाने पुस्तक वाचलंच पाहिजे असे सांगितले. त्याचप्रमाणे ग्रंथालय मध्ये वाचक जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कर्मचारी डॉ. शेख शहेनाज मॅडम, डॉ.श्याम इंगळे सर, श्री महेश वाखरडकर सर, प्रा. हाटेकर सर,श्री देशपांडे,श्री कोल्हेवाड, श्री चंदापुरे, श्री आसळकर, श्रीमती नगारे ताई आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!