
नांदेड| नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयक पदाच्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी ही घोषणा केली.


राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर समिती अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याअंतर्गत नव्या नियुक्त्या व रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रवी संगनवार यांची नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त होते.


त्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा निमंत्रक प्रदीप नागपूरकर आणि समन्वयक राम तरटे यांनी जिल्ह्यातील संघटना अधिक सक्षम करण्यासाठी वेळ द्यावा, अशी सूचना राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केली आहे. या नियुक्तीबद्दल राम तरटे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


