सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मुन्ना भाऊ शिंदे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

मुन्ना भाऊ शिंदे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा अध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे यांनी दिनांक 21 एप्रिलपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रकृती खालावल्यामुळे 23 एप्रिलच्या रात्री तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे काही दिवसांपासून तणावपूर्ण असलेले शहरातील वातावरण आता काहीसे निवळले असून जाहीर करण्यात आलेला हिमायतनगर बंदही मागे घेण्यात आला आहे. परिणामी बाजारपेठ पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. उपोषणादरम्यान वाढत्या उन्हाचा तडाखा आणि अन्न-पाण्याचा पूर्ण अभाव यामुळे मुन्ना भाऊ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर...
हिमायतनगरमध्ये जुन्या ग्रामपंचायत इमारतीला ‘डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ नाव देण्याची मागणी

हिमायतनगरमध्ये जुन्या ग्रामपंचायत इमारतीला ‘डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ नाव देण्याची मागणी

सामाजिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जुन्या ग्रामपंचायत इमारतीचे नामकरण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करून तेथे सांस्कृतिक सभागृह, वाचनालय व अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी समाज विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गंगाधर मामीडवार सावकार यांनी दान दिलेल्या जागेत १९९० ते १९९५ या कालावधीत समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. या ठिकाणी सर्व समाजासाठी सार्वजनिक वाचनालयही सुरू करण्यात आले होते. नंतर हिमायतनगर येथे न्यायालयास मंजुरी मिळाल्यानंतर जागेअभावी हे समाजमंदिर ग्रामपंचायत कार्यालयासाठी वापरण्यात आले. त्यामुळे वाचनालय बंद पडले. आता नगरपंचायत कार्यालय अन्यत्र स्थलांतरित झाल्याने ही इमारत पुन्हा समाजाच्या उपयोगासाठी उपलब...
‘कूल रूफिंग’चा प्रभावी परिणाम; नांदेडमध्ये तापमानात ७-८ अंशांची घट, १०० कुटुंबांना दिलासा

‘कूल रूफिंग’चा प्रभावी परिणाम; नांदेडमध्ये तापमानात ७-८ अंशांची घट, १०० कुटुंबांना दिलासा

सामाजिक
नांदेड| शहरातील गरजू वस्त्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘कूल रूफिंग’ उपक्रमामुळे घरांच्या आतील तापमानात तब्बल ७ ते ८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. या उपक्रमामुळे सुमारे १०० कुटुंबे व लघु व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा अभिनव प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ, Practical Action (PAC) आणि AIDMI यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निसर्ग आधारित उपाय’ (Nature-Based Solutions) अंतर्गत राबविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लहान व कमी उंचीच्या घरांच्या छतांवर ‘कूल रूफिंग’ तंत्रज्ञान वापरून उष्णता परावर्तित केली जाते, ज्यामुळे घरातील तापमान लक्षणीयरीत्या कमी होते. कडक उन्हाळ्यात घरांसह छोट्या व्यावसायिक जागांमधील उकाडा कमी झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य झाले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णुनगर परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी भे...
भरधाव हायवांमुळे वाढता धोका; अपघातांच्या मालिकेनंतर संताप व्यक्त

भरधाव हायवांमुळे वाढता धोका; अपघातांच्या मालिकेनंतर संताप व्यक्त

सामाजिक
नांदेड| शहरात भरधाव धावणाऱ्या हायवा वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काल लातूर फाटा येथे पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर परवा एका शाळकरी मुलाला अल्पवयीन चालकाने चिरडल्याची घटना घडली. यापूर्वी ढवळे कॉर्नर येथे एका कीर्तनकार महाराजांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच आज भरधाव हायवाने वीजेचा पोल, तारा आणि साईबाबा कमान पाडल्याची घटना घडली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक डॉ. अभिषेक सौदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे. वारंवार सूचना देऊनही हायवा चालक व मालक नियम पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील कौठा, वसरणी, असर्जन, सिडको, हडको आणि असदवन या भागात सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हायवा वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा जनतेला रस...
हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनास निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष व प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने वारंवार आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत, दि. २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा...
आई-वडील व गुरु न विसरणाऱ्या देगलूरकरांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा  — ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर

आई-वडील व गुरु न विसरणाऱ्या देगलूरकरांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा — ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर

सामाजिक
देगलूर| येथील बंडयाप्पा मठ संस्थान, गांधी चौक येथे गुरुवर्य पंडित बाबुरावजी उप्पलवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिष्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे हा सोहळा विशेष ठरला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर म्हणाले की, आजच्या काळात अनेकजण आई-वडिलांविषयी कृतज्ञता विसरत आहेत. मात्र देगलूरकरांनी गुरु, आई-वडील यांच्याप्रती दाखवलेला आदर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे. “आई, वडील आणि गुरुजन यांना कधीही विसरू नये,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात गुरुवर्य पंडित बाबुरावजी उप्पलवार व सौ. सरस्वतीबाई उप्पलवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकशाहीर रमेश गिरी, दिगू तुमवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश गिरी यांनी पंडितजींबाबतचे अनुभव सांगत त्यांच्या शताब्दी सोहळ्यालाही उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. दिगू तुमवाड यांनी पंडित...
जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

सामाजिक
नांदेड | जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्तावना शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केली. यावेळी शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष विठ्ठल ताकबीडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस संजय कोठाळे ...
विठ्ठलराव संभाजी हरडफकर यांचे निधन; आज अंत्ययात्रा

विठ्ठलराव संभाजी हरडफकर यांचे निधन; आज अंत्ययात्रा

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक कै. विठ्ठलराव संभाजी हरडफकर (कदम) यांचे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरातून श्री संभाजी राजे हॉस्टेल येथून निघणार असून, अंत्यसंस्कार वैैकुंठधाम स्मशानभूमी, लकडोबा चौक, हिमायतनगर येथे करण्यात येणार आहेत. स्व. विठ्ठलराव हरडफकर यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार असून, त्यांच्या निधनाने समाजातील एक जेष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐...
द्रोपताबाई रामजी अनगुलवार यांचे निधन

द्रोपताबाई रामजी अनगुलवार यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सवना ज. येथील रहिवासी द्रोपताबाई रामजी अनगुलवार (वय ८२) यांचे सोमवारी सकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, तसेच पोशट्टी अनगुलवार व संतोष अनगुलवार यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यसंस्कार आजच दुपारी ४.२० वाजता करण्यात येणार आहे. स्व. द्रोपताबाई अनगुलवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. 💐🙏...
लोहा शहरात उघड्यावर मांसविक्री थांबवा; वाहतूक व हातगाड्यांना शिस्त लावा – वसंतराव पवार

लोहा शहरात उघड्यावर मांसविक्री थांबवा; वाहतूक व हातगाड्यांना शिस्त लावा – वसंतराव पवार

सामाजिक
लोहा| लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व त्यांच्या टीमकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करत काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक वसंतराव पवार यांनी शहरातील काही गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. शहरातील गजबजलेल्या भागात उघड्यावर होणारी मांसविक्री, बेशिस्त वाहतुकीमुळे होणारी रहदारीची कोंडी, हातगाड्यांचे अनियमित पार्किंग, तसेच नाल्यांवरील अतिक्रमण आणि शासकीय जागा भाड्याने देऊन आर्थिक फायदा घेण्याचे प्रकार यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पवार यांनी नगराध्यक्ष, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व संबंधित प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. शहरातील बसस्थानक, शिवाजी चौक, बेरळी फाटा या मुख्य मार्गांवर नाल्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्यावर दुकान...
error: Content is protected !!