जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

नांदेड | जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्तावना शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केली.

यावेळी शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष विठ्ठल ताकबीडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस संजय कोठाळे यांनी केले, तर शिवकुमार देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

या निमित्ताने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी जन्मोत्सव समितीच्या वतीने परिसरात अन्नदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!