द्रोपताबाई रामजी अनगुलवार यांचे निधन

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सवना ज. येथील रहिवासी द्रोपताबाई रामजी अनगुलवार (वय ८२) यांचे सोमवारी सकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, तसेच पोशट्टी अनगुलवार व संतोष अनगुलवार यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यसंस्कार आजच दुपारी ४.२० वाजता करण्यात येणार आहे.

स्व. द्रोपताबाई अनगुलवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. 💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!