महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

महाराष्ट्र
नांदेड| राज्य सरकारकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विरोध करण्यासाठी रविवारी नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील विविध समाजबांधवांचा मोठा जनसमुदाय या महामोर्चात सहभागी झाला. महात्मा फुले पुतळा येथून महामोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजातील ५९ अनुसूचित जातींवर त्याचा परिणाम होईल, असा दावा आंदोलकांनी केला. राज्य सरकारने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावर अनुसूचित जातीतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपला विरोध सरकारपर्यंत पोहोचवला. महामोर्चा जिल्हाधि...
शहापूर येथे ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावर फवारणी

शहापूर येथे ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावर फवारणी

शेती
मजुरांची कमतरता, वेळेची बचत आणि अचूक फवारणी; शेतकरी गटाचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शेतीच्या कामांसाठी मजुरांची दिवसेंदिवस जाणवणारी कमतरता आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहापूर येथील शेतकरी गटाने तब्बल साडेपाच लाख रुपये खर्च करून ड्रोन मशीन खरेदी केली असून, त्याद्वारे सोयाबीन पिकावर फवारणी सुरू केली आहे. पारंपरिक पद्धतीने पिकांवर फवारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र, ग्रामीण भागात मजुरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फवारणीसह निंदणी, कोळपणी ...
मजीप्रा कार्यकारी अभियंत्याविरोधात पुन्हा तक्रार; पदोन्नती रद्द करून निलंबनाची मागणी

मजीप्रा कार्यकारी अभियंत्याविरोधात पुन्हा तक्रार; पदोन्नती रद्द करून निलंबनाची मागणी

महाराष्ट्र
बहुजन टायगर युवा फोर्सचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन; निष्पक्ष चौकशी, गुन्हा दाखल व अपहाराची रक्कम वसूल करण्याची मागणी नांदेड, प्रतिनिधी| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) नांदेड येथील कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके यांच्या विरोधात बहुजन टायगर युवा फोर्सने पुन्हा एकदा सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे. उपअभियंता म्हणून कार्यरत असताना झालेल्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून त्यांची पदोन्नती रद्द करावी, निलंबित करावे, गुन्हा दाखल करावा तसेच कथित अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांनी दिलेल्या निवेदनात, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्याचा दावा केला आहे. चौकशी प्रलंबित असतानाच त्यांची कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल संघटनेने...
प्रामाणिकपणाचा आदर्श! हरवलेला मोबाईल मालकाला परत; संतोष अमीलकंठवार यांचे सर्वत्र कौतुक

प्रामाणिकपणाचा आदर्श! हरवलेला मोबाईल मालकाला परत; संतोष अमीलकंठवार यांचे सर्वत्र कौतुक

महाराष्ट्र
वजीराबाद पोलिसांच्या सहकार्याने मोबाईल सुरक्षित परत; माणुसकीचा दिला प्रेरणादायी संदेश नांदेड, प्रतिनिधी| आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या काळातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळाले. महावीर चौक परिसरातील व्यावसायिक संतोष अमीलकंठवार यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल स्वतःकडे न ठेवता वजीराबाद पोलिसांच्या मदतीने तो त्याच्या मूळ मालकापर्यंत सुरक्षित पोहोचवून समाजासमोर आदर्श निर्माण केला. संतोष अमीलकंठवार हे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक मोबाईल पडलेला दिसला. मोबाईलमधील उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने वजीराबाद पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आवश्यक चौकशी करून मोबाईलच्या मालकाशी संपर्क साधला. चौकशीनंतर हा मोबाईल कौशिक मोलणकळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मोबाईल सुरक्षितपणे त्यांच्या ताब्य...
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या?  कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या? कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

शेती
वारंगटाकळीतील शेतकरी चंद्रभान कदम यांनी विष प्राशन करून संपविले जीवन हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) यांनी शेतातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) घडली. त्यांना तातडीने हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, चंद्रभान कदम हे शेतीच्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेत होते. शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या तसेच सेतू केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृताचे पुत्र निवृत्ती कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्...
शासनाच्या कार्यालयात मराठीची विटंबना खपवून घेणार नाही; दोषींवर विभागीय चौकशी होणार : मंत्री उदय सामंत

शासनाच्या कार्यालयात मराठीची विटंबना खपवून घेणार नाही; दोषींवर विभागीय चौकशी होणार : मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र
नांदेडमध्ये स्पष्ट आश्वासन; राज्यातील पहिली शुद्धलेखन कार्यशाळा नांदेडमधून सुरू करण्याची घोषणा नांदेड | महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेची शासनाच्या कार्यालयांमध्ये होणारी विटंबना कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. संबंधित प्रकरणातील उपविभागीय अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथे दिले. बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) नांदेडमध्ये साहित्यिक, पत्रकार आणि विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी मराठी भाषेच्या वापराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची गंभीर दखल घेतली. "मी केवळ राजकीय प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राचा मराठी भाषा मंत्री म्हणून बोलत आहे. शासनाच्या कार्यालयात मराठी भाषेचा अवमान किंवा विटंबना होणे अजिबात स्वीकारले जाणार नाह...
हिमायतनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेची धडक कारवाई

हिमायतनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेची धडक कारवाई

महाराष्ट्र
रस्ते झाले मोकळे... पण अनेकांच्या चुली विझण्याची भीती!  हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नगरपंचायत प्रशासनाने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत शहरातील प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त केले. या कारवाईमुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला, नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, दुसरीकडे हातावर पोट असलेल्या फेरीवाले, हातगाडे चालक आणि लहान व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. नगरपंचायतीकडे शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडेधारकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देऊन अतिक्रमण स्वखुशीने हटविण्याचे आवाहन केले होते. काहींना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या...
पैनगंगा नदीला महापूर; गांजेगाव पुलावरून पाणी, विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क पुन्हा खंडित!

पैनगंगा नदीला महापूर; गांजेगाव पुलावरून पाणी, विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क पुन्हा खंडित!

महाराष्ट्र
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप; बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आलेल्या पुराचा परिणाम पैनगंगा नदीवर झाला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी गांजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने विदर्भ–मराठवाड्यादरम्यानचा महत्त्वाचा संपर्क पुन्हा एकदा खंडित झाला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शेकडो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्र, पूल आणि सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या गांजेगाव बंधाऱ्य...
सहस्त्रकुंड धबधबा त्रिधारांनी ओथंबून वाहतोय!

सहस्त्रकुंड धबधबा त्रिधारांनी ओथंबून वाहतोय!

महाराष्ट्र
विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील निसर्गरम्य सहस्त्रकुंड धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून धबधब्याचे त्रिधारांनी कोसळणारे विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. हे मनोहारी दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. 📸 छायाचित्र : अनिल मादसवार Oplus_16908288...
हिमायतनगर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना जीवदान

हिमायतनगर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना जीवदान

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून वाढल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीप पिकांना या मुरवणी पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात अधूनमधून सुरू असलेल्या मौसमी पावसामुळे खरीप पिकांची स्थिती सुधारत आहे. यंदा पिके चांगली उभी असली तरी अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरत असल्याचे कृषी जाणकारांचे मत आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही अद्याप तालुक्यात ...
error: Content is protected !!