
बहुजन टायगर युवा फोर्सचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन; निष्पक्ष चौकशी, गुन्हा दाखल व अपहाराची रक्कम वसूल करण्याची मागणी
नांदेड, प्रतिनिधी| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) नांदेड येथील कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके यांच्या विरोधात बहुजन टायगर युवा फोर्सने पुन्हा एकदा सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे. उपअभियंता म्हणून कार्यरत असताना झालेल्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून त्यांची पदोन्नती रद्द करावी, निलंबित करावे, गुन्हा दाखल करावा तसेच कथित अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.



बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांनी दिलेल्या निवेदनात, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्याचा दावा केला आहे. चौकशी प्रलंबित असतानाच त्यांची कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली असून, त्यांची छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाबाहेर बदली करण्याचीही मागणी केली आहे.



या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी; अन्यथा बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


टीप : या प्रकरणातील आरोप हे तक्रारदारांनी केलेले असून, संबंधित अधिकाऱ्यांची बाजू किंवा अधिकृत चौकशीचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.


