महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड–तीरुचानुर विशेष रेल्वेची सेवा सप्टेंबरमध्येही सुरू; ५ फेऱ्यांचा प्रवाशांना लाभ

नांदेड–तीरुचानुर विशेष रेल्वेची सेवा सप्टेंबरमध्येही सुरू; ५ फेऱ्यांचा प्रवाशांना लाभ

तेलंगणा, महाराष्ट्र
अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय; मंगळवारी नांदेडहून तर बुधवारी तीरुचानुरहून सुटणार नांदेड | नांदेड आणि तिरुपतीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 07603/07604 नांदेड–तीरुचानुर–नांदेड विशेष रेल्वेगाडीची सेवा सप्टेंबर २०२६ मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची संरचना कायम ठेवून ही विशेष रेल्वे धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07603 नांदेड–तीरुचानुर विशेष सप्टेंबर महिन्यात प्रत्येक मंगळवारी धावणार आहे. या गाडीच्या १, ८, १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी एकूण पाच फेऱ्या होणार आहेत. तर गाडी क्रमांक 07604 तीरुचानुर–नांदेड विशेष प्रत्येक बुधवारी धावणार असून, २, ९, १६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी एकूण पाच फेऱ्या करण्यात येणार आ...
शहापूर–हिप्परगा मार्गे नांदेड बससेवेला प्रारंभ

शहापूर–हिप्परगा मार्गे नांदेड बससेवेला प्रारंभ

महाराष्ट्र
खासदार अजित गोपछडे, आमदार जितेश अंतापूरकर यांच्या पाठपुराव्याला यश; शहापूरकरांची गैरसोय दूर होणार देगलूर, गंगाधर मठवाले | देगलूर तालुक्यातील महत्त्वाची उपबाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शहापूर गावाला नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही समस्या खासदार डॉ. अजित गोपछडे व आमदार जितेश अंतापूरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देगलूर आगाराच्या वतीने नांदेड–नरसी–आदमपूर–खतगाव–हिप्परगा–शेवाळा–आलूर मार्गे शहापूर येथे मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा प्रारंभ आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून सेवेला सुरुवात केली. तसेच बसचे चालक व वाहक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शहापूर व परिसरातील जवळपास १...
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व; महापौरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व; महापौरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

क्रीडा
२२ वी राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न; राज्यभरातील २७० खेळाडूंचा सहभाग नांदेड, प्रतिनिधी| महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित २२ व्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढती उत्साहात पार पडल्या. यंदाच्या स्पर्धेत ठाणे, मुंबई आणि पुणे येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मैदान गाजविले. विजेत्या खेळाडूंना नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सलग २२ वर्षांपासून या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सलग २२ वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणारी देशातील पहिली जिल्हा बॅडमिंटन संघटना म्हणून नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेचा गौरव होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्...
तृतीयपंथीयांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अतुल सावे

तृतीयपंथीयांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेडमध्ये तृतीयपंथीयांसाठी तीन एकर जागा; खासदार निधीतून ३० लाखांची तरतूद — सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवात चर्चासत्र व जनजागृती नांदेड | तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. नांदेड शहरात तृतीयपंथीयांच्या विकासासाठी तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, खासदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. भविष्यात विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड आणि विशेष सहाय्यक, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव २०२६’च्या दुसऱ्या दिवशी कुसुम सभागृह, नांदेड येथे तृतीय पंथीयांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, जनजागृती आणि रोजगाराच्या संधींबाबत कार्य...
हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात संपन्न; रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात संपन्न; रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद

महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर | भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरात 'हर घर तिरंगा २०२६' अभियान अत्यंत उत्साहात सुरू आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून दि.१३.०८.२०२६ रोजी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक भव्य आणि अभूतपूर्व *'तिरंगा बाईक रॅली'* काढण्यात आली. शेकडो दुचाकीस्वार, हातात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणा अशा अत्यंत भारावून टाकणाऱ्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली. या रॅलीने आज संपूर्ण नांदेड शहराला देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले. या अभूतपूर्व तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात नविन नांदेड भागातील हडको बस स्टॉप पासुन करण्यात आली. हडको चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केल्यानंतर तिरंगा कॅनव्हसवर स्वाक्षरी करुन *महापौर सौ...
दोन-तीन वर्षांपासून गायगोठ्याचे अनुदान प्रलंबित; शहापूरचे शेतकरी आर्थिक संकटात

दोन-तीन वर्षांपासून गायगोठ्याचे अनुदान प्रलंबित; शहापूरचे शेतकरी आर्थिक संकटात

शेती
देगलूर /शहापूर,गंगाधर मठवाले | शासनाच्या गायगोठा योजनेअंतर्गत कामे पूर्ण करून दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटला असतानाही शहापूर येथील पाच शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने प्रलंबित गायगोठ्याचे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, मजूर आणि गरजूंसाठी शासनाकडून विविध योजनांची घोषणा करून त्यांची माहिती दिली जाते. या योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी नागरिक आवश्यक ती कामे पूर्ण करतात. मात्र, अनेकदा काम सुरू करण्यापूर्वी शासनाकडून कोणतीही रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून अथवा उसनवारी करून कामे पूर्ण करावी लागतात. याच पद्धतीने शहापूर येथील मुद्रिका भुमरेडी, भूपतवार यलरेडी भुमरेडी, चामावार प्रकाशरेडी हनमलू चितलवार, चंद्रकलाबाई चंदर इबितवार आणि गगामणी व्...
वटफळी ग्रामपंचायतीचा कारभार ‘रामभरोसे’! राष्ट्रध्वज स्थळासमोरच घाणीचा बाजार

वटफळी ग्रामपंचायतीचा कारभार ‘रामभरोसे’! राष्ट्रध्वज स्थळासमोरच घाणीचा बाजार

महाराष्ट्र
१५ ऑगस्ट तोंडावर; रस्त्यावर चिखल-पाणी, नाल्या तुंबल्या, RO फिल्टर असूनही ग्रामस्थ तहानलेले — वर्षभर तक्रारी करूनही प्रशासन सुस्त हिमायतनगर, अनिल मादसवार| देशभर स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना हिमायतनगर तालुक्यातील वटफळी गावात मात्र राष्ट्रध्वज स्थळासमोरच अस्वच्छता, चिखल आणि साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व गावाकऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. राष्ट्रध्वज फडकविण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवता येत नसेल, तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका चालतो तरी कसा? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वटफळी येथील मुख्य रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्या तुंबलेल्या असून पाण्याचा न...
आ. कोहोळीकर यांच्या पाठपुराव्याला यश:– हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी

आ. कोहोळीकर यांच्या पाठपुराव्याला यश:– हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी

महाराष्ट्र
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हदगाव तालुक्यातील पक्षकार, वकील आणि नागरिकांना कायदेशीर कामांसाठी नांदेड येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी, वकिलांसह पक्षकारांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि आर्थिक भुर्दंडात मोठी बचत होणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. आंदालनाचा/पाठपुराव्याचा प्रवास या महत्त्वाच्या न्यायालयासाठी आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांनी स्थानिक वकील संघटनेच्या सहकार्याने विधी व न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने न्यायालयासोबतच सरकारी वकील कार्यालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी, कर्मचारी पदनिर्मित...
हाणेगाव आश्रमशाळेतील भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा! जेवणानंतर उलट्यांचा त्रास

हाणेगाव आश्रमशाळेतील भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा! जेवणानंतर उलट्यांचा त्रास

महाराष्ट्र
विद्यार्थ्यांना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात केलं दाखल देगलूर, गंगाधर मठवाले | तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना भोजनानंतर विषबाधेसदृश त्रास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मांसाहारी भोजन केल्यानंतर अचानक उलट्या होण्यासह त्रास सुरू झाल्याने आश्रमशाळा प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने देगलूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे त्रास झाला, भोजनातील कोणता पदार्थ कारणीभूत ठरला आणि भोजन तयार करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निवासी...
नांदेडमध्ये सिटूचे जोरदार जेल भरो आंदोलन; साडेतीन हजारांहून अधिक कामगारांचा सहभाग

नांदेडमध्ये सिटूचे जोरदार जेल भरो आंदोलन; साडेतीन हजारांहून अधिक कामगारांचा सहभाग

महाराष्ट्र
नांदेड| केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सिटू (CITU) कामगार संघटनेच्या वतीने नांदेड शहरात सोमवारी जोरदार जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात साडेतीन हजारांहून अधिक कामगार सहभागी झाले. आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्यासह विविध क्षेत्रातील कामगारांची मोठी उपस्थिती होती. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नांदेड शहरातील वातावरण काही काळ आंदोलनमय झाले. कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारच्या कामगार धोरणांचा निषेध केला. चार श्रम संहिता रद्द करण्याची मागणी यावेळी चार श्रम संहिता रद्द कराव्यात, जनसुरक्षा कायदा रद्द करावा, तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन, कर्मचारी दर्जा आणि सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालया...
error: Content is protected !!