महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 30 एप्रिलला रद्द; प्रवाशांनी नोंद घ्यावी

नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 30 एप्रिलला रद्द; प्रवाशांनी नोंद घ्यावी

महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेक (train set) उपलब्ध नसल्यामुळे ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित मार्गावरील प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन यानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे....
फार्मर आयडी नोंदणीबाबत महत्त्वाचे आवाहन ; २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा

फार्मर आयडी नोंदणीबाबत महत्त्वाचे आवाहन ; २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा

शेती
पुणे| राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यातील एकूण १.७१ कोटी खातेदारांपैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अद्याप काही शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर (CSC) भेट देऊ शकतात किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी २० मे २०२६ पूर्वी आ...
उष्णतेच्या लाटेत वानरांचाही सावलीकडे कल; निसर्ग देतोय शांततेचा संदेश!

उष्णतेच्या लाटेत वानरांचाही सावलीकडे कल; निसर्ग देतोय शांततेचा संदेश!

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुका परिसरात सध्या तीव्र उष्णतेची लाट उसळली असून तापमान तब्बल 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. या उष्णतेच्या झळा फक्त मानवांनाच नव्हे तर प्राणीमात्रांनाही सहन कराव्या लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. https://www.youtube.com/shorts/CE0gVHIVGpA शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात एक वेगळे आणि विचार करायला लावणारे दृश्य समोर आले आहे. मंदिराजवळील लिंबाच्या झाडाखाली वानरांचा एक समूह उन्हापासून बचाव करण्यासाठी शांतपणे विसावा घेताना दिसला. मानवाचे पूर्वज मानले जाणारे हे वानरही कडक उन्हापासून वाचण्यासाठी सावलीचा आधार घेत असल्याने निसर्गाशी जुळवून घेण्याचा सुंदर संदेश देत आहेत. “बाहेर ऊन फार आहे… दुपारी सावलीतच आराम करा,” असा जणू संदेशच ही वानरांची ...
30 एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

30 एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

महाराष्ट्र, माहिती
मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मंत्री अतुल सावे नांदेड| राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी 30 एप्रिल 2026 रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृह येथे 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या मेळाव्याचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती...
सीमा भागातील सिमेंट रस्त्यांमध्ये मोठा घोटाळा? उच्चस्तरीय चौकशीची मागणी तीव्र

सीमा भागातील सिमेंट रस्त्यांमध्ये मोठा घोटाळा? उच्चस्तरीय चौकशीची मागणी तीव्र

महाराष्ट्र
बिलोली (गोविंद मुंडकर) बिलोली तालुक्यातील सीमा भागात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, अनेक गावांमध्ये रस्ते कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून, संबंधित गुत्तेदाराचे अधिक लाभासाठी दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.. येथील अधिकारी चांगले काम करण्याचा आग्रह धरून सुद्धा त्यांचा उपयोग शून्य दिसतो आहे. बावलगांव येथे सुरू असलेल्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांनी याचे चित्रीकरणही केले असून, संबंधित पुरावे उपलब्ध असतानाही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येसगी येथील कामाबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. कार्ला (बु.) येथे तर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले...
हिमायतनगर तापतंय! 44°C वर पोहोचले तापमान; नागरिक हैराण, आरोग्याचा धोका वाढला

हिमायतनगर तापतंय! 44°C वर पोहोचले तापमान; नागरिक हैराण, आरोग्याचा धोका वाढला

महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात उष्णतेचा अक्षरशः कहर सुरू असून, सोमवारी दुपारी तापमानाने थेट 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सायंकाळी 5 वाजेपर्यंतही तापमान 41 अंशांवर स्थिर राहिल्याने उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गरम वाऱ्याच्या झळा इतक्या तीव्र आहेत की, घरात बसूनही अंगावर उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडलेले दिसत असून, अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. दिवसाच्या कडक उन्हामुळे दुपारचे व्यवहार ठप्प होत असताना, संध्याकाळी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडताना दिसत आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शहरातील काही सामाजिक संस्था व व्यापाऱ्यांनी चौकाचौकात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांन...
पेनूर येथील जि.प. हायस्कूलमध्ये ‘आनंददायी खेळ’ उपक्रम

पेनूर येथील जि.प. हायस्कूलमध्ये ‘आनंददायी खेळ’ उपक्रम

क्रीडा
मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांचा अभिनव उपक्रम लोहा| अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांमध्ये काहीशी साशंकता दिसून येते. मात्र, या पार्श्वभूमीवर काही जि.प. शाळा खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मागे टाकत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे पेनूर (ता. लोहा) येथील जिल्हा परिषद हायस्कूल. विष्णुपुरी येथील शाळेला नावलौकिक मिळवून देणारे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांनी पेनूर येथील शाळेचा पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचे चित्रच बदलून टाकले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी खेळ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी उन्हाळ्यात इकडे-तिकडे भटकण्याऐवजी शाळा आणि मैदानावर आनंदाने वेळ घालवत आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लाठी-काठी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, रग्बी, अ‍ॅथलेटिक्स, कॅरम, बुद्धिबळ, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बा...
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिण्या बरखास्त; नव्या गठनाची प्रक्रिया लवकरच

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिण्या बरखास्त; नव्या गठनाची प्रक्रिया लवकरच

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील बहुतेक तालुका कार्यकारिण्या बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. माहूर आणि अर्धापूर तालुका कार्यकारिणी वगळता उर्वरित सर्व तालुक्यांतील कार्यकारिण्यांना बरखास्त करण्यात आले असून, त्यांचे नव्याने गठन करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे आणि कार्याध्यक्ष अनिल कसबे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी दिली. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवले जातात. मात्र, अर्धापूर आणि माहूर वगळता इतर तालुका कार्यकारिण्यांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने गठित झालेल्या अर्धापूर व माहूर कार्यकारिणी या निर...
बिलोली तालुक्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; शेतकऱ्यांसमोर अडचणींची शक्यता

बिलोली तालुक्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; शेतकऱ्यांसमोर अडचणींची शक्यता

महाराष्ट्र
नांदेड/बिलोली (गोविंद मुंडकर) बिलोली तालुका सीड्स, फर्टिलायझर्स व पेस्टिसाईड असोसिएशनच्या वतीने दिनांक २७ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांच्या बेमुदत बंद आंदोलनाला पाठिंबा देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजीत तुपेवार, उपाध्यक्ष भागवत लोकमनवार, आदित्य बेजगमवार आणि सचिव साईनाथ मंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांना निवेदनही देण्यात आले आहे. या बंदच्या मागे अनेक महत्त्वाचे मुद्दे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनधिकृत एचटी बीटी बियाण्यांची विक्री रोखण्याची मागणी, खत कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धती बंद करण्याची गरज, तसेच अवैध कीटकनाशके व ...
लोहा–कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर

लोहा–कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर

राजकारण, शेती
नांदेड | खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या लोहा–कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 134 कोटी 58 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मंजुरीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली होती, तर काही भागात जमिनीही वाहून गेल्याचे चित्र होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार चिखलीकर यांनी थेट राज्य शासनाकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार चिखलीकर यांनी आभार व्यक्त केले. ...
error: Content is protected !!