धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव उत्साहात; भव्य मिरवणूक, महाआरतीने भक्तिमय वातावरण

कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव उत्साहात; भव्य मिरवणूक, महाआरतीने भक्तिमय वातावरण

धर्म अध्यात्म
नवीन नांदेड | बसवेश्वर नगर, जुना कौठा येथील श्री नृसिंह नरोबा मंदिरात नृसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ३० एप्रिल रोजी पुजारी गुरू व्यंकटेश मुळी यांच्या हस्ते विधीवत पूजा, अभिषेक, पारायण व कीर्तन कार्यक्रम पार पडले. सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले. या प्रसंगी टाळ-मृदंगाच्या गजरात व जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरातून रविनगर मार्गे मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणुकीचे विविध ठिकाणी भाविकांनी पूजन करून स्वागत केले. जन्मोत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २२ ते ३० एप्रिल दरम्यान श्रीराम कथा, काकडा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हभप स...
धम्मजयो यांच्या शिकवणीमुळे आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित : भदंत पंय्याबोधी थेरो

धम्मजयो यांच्या शिकवणीमुळे आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित : भदंत पंय्याबोधी थेरो

धर्म अध्यात्म
नांदेड| ध्यान आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित वॉट फ्रा धम्मकाया संस्थेच्या कार्यामुळे बौद्ध शिकवणींना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा दृष्टिकोन प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते थायलंड येथील धम्मकाया सेंटरमध्ये वसुंधरा दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला जगभरातील सुमारे एक लाख भिक्षू आणि नऊ लाख बौद्ध उपासक-उपासिकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सांगितले की, लुंग पोर धम्मजायो यांच्या शिकवणीमुळे ध्यान हे केवळ धार्मिक मर्यादेत न राहता सर्व धर्मीयांसाठी तसेच धर्मनिरपेक्ष पद्धतीने स्वीकारता येणारे साधन म्हणून विकसित झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर बौद्ध विचारांचा प्रसार अधिक व्यापक झाला आहे. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट्स आणि वर्ल्ड बुद्धिस्ट संघ फोरम यांच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात धम्मजयो यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त तसेच पृथ...
उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

धर्म अध्यात्म, सामाजिक
नांदेड | मराठवाड्यात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी गुरुद्वारा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या निर्देशानुसार, सर्व प्रवेशद्वारांवर व स्थानिक गुरुद्वारांमध्ये थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी निवासस्थाने, कार्यालये व गुरुद्वारांमध्ये प्रथमोपचार (First-Aid) किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, लंगरसोबत भाविकांना थंड लस्सी दिली जात असून वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका सतत सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ व ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह ...
श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सवाला भक्तिमय प्रारंभ

श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सवाला भक्तिमय प्रारंभ

धर्म अध्यात्म
नवीन नांदेड, प्रतिनिधी | बसवेश्वर नगर, जुना कौठा परिसर येथील श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिर देवस्थानात दि. २४ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत १६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर संस्थान व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आठ दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भारावून जाणार आहे. सप्ताहादरम्यान पहाटे काकडा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीराम कथा, हरिपाठ तसेच दररोज रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक कार्यक्रमानुसार पहाटे ५ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ...
२७ वी अमरनाथ यात्रा जुलैमध्ये; मर्यादित जागा शिल्लक, भाविकांना आवाहन

२७ वी अमरनाथ यात्रा जुलैमध्ये; मर्यादित जागा शिल्लक, भाविकांना आवाहन

धर्म अध्यात्म
नांदेड (प्रतिनिधी) खडतर, साहसी आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी अमरनाथ यात्रा यंदा ३ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सलग २६ वर्षांचा यशस्वी अनुभव असलेल्या या यात्रेचे हे २७ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या केवळ १० जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असून भगवान शंकराने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य याच पवित्र गुहेत सांगितल्याची श्रद्धा आहे. या गुहेत दरवर्षी नैसर्गिकरीत्या बर्फाचे शिवलिंग तयार होते, जे या यात्रेचे प्रमुख आकर्षण मानले जाते. यंदाची अधिकृत यात्रा ३ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली आहे. या यात्रेसाठी...
हदगाव शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष; भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

हदगाव शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष; भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरात अक्षय तृतीया निमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १९ एप्रिल रोजी घरोघरी प्रतिमा पूजन करण्यात आले, तर २० एप्रिल रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय परशुराम’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. शोभायात्रेची सुरुवात शहरातील मानाचे श्री सत्य गणपती मंदिर येथून करण्यात आली. पारंपरिक गणपती मार्गानुसार ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरली. शेवटी भगवान परशुराम यांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. परसरामजी तिवारी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. या सोहळ्यासाठी हदगाव शहरासह तामसा, मनाठा, भानेगाव, शिरड आदी गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, पुरुष आणि लहान मुलांचा उत्साह विशेष उल्...
भीमजयंती सोहळ्यात जनतेचे मोलाचे सहकार्य – पो.नि. ओमकांत चिंचोलकर

भीमजयंती सोहळ्यात जनतेचे मोलाचे सहकार्य – पो.नि. ओमकांत चिंचोलकर

धर्म अध्यात्म
नांदेड | महापुरुषांच्या जयंती सोहळ्यांचे आयोजन करताना पोलीस प्रशासनाबरोबरच जनतेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते, आणि हे सहकार्य सिडको भागातील भीमजयंती मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिळाले, असे प्रतिपादन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले. सिडको परिसरात भीमजयंती सोहळा शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पंचशील बुद्ध विहार, हडको येथे पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात सुनील वडगावकर यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल माहिती दिली. यावेळी पो.नि. चिंचोलकर म्हणाले की, “पोलीस विभाग हा जनतेसाठीच आहे. सर्वांच्या सहकार्याने कोणतेही कार...
‘शिवा’तर्फे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य मिरवणूक व विचारमंथन

‘शिवा’तर्फे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य मिरवणूक व विचारमंथन

धर्म अध्यात्म
नांदेड | ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. मिरवणुकीनंतर झालेल्या जाहीर सभेत महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे सखोल मंथन करण्यात आले. यंदा ‘शिवा’ संघटनेच्या वतीने जयंतीचे २५ वे वर्ष साजरे करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभेत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ‘शिवा’चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे होते. उद्घाटक म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, माजी आमदार अमरनाथ राजूरक...
श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा; शहरात जल्लोषाचे वातावरण

श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा; शहरात जल्लोषाचे वातावरण

धर्म अध्यात्म
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) वाढोणा शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेच्या पुढाकारातून श्री राम नवमी व हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 18 रोजी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. डोळे दिपवून टाकणाऱ्या फटाक्यांची आकर्षक आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि रिद्धम लाईव्ह संगीताच्या जल्लोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या शोभायात्रेत गोमाता, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज व संकटमोचन हनुमान यांच्या सुंदर मूर्तींच्या झांक्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. या पद्धतीने शोभायात्रेत शहरासह विविध भागातून सहभागी झालेल्या युवकांनी नृत्य करत उत्साह व्यक्त केला, तर “जय श्रीराम” जय हनुमान च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेचा समारोप लकडोबा चौक येथे करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी एकत्र येत हन...
खुरगाव येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

खुरगाव येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

धर्म अध्यात्म
नांदेड | तालुक्यातील खुरगाव (नांदुसा परिसर) येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात रविवार, १९ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार असून निर्वाणपदस्थ भदंत जीनरत्न महाथेरो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले की, या प्रसंगी विपश्यनाचार्य भदंत पंय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना होणार आहे. तसेच थायलंड धम्म सहलीवरून परतलेल्या बौद्ध उपासक-उपासिकांचा भव्य सत्कारही करण्यात येणार आहे. कार्यक्रमात परित्राण पाठ, बोधीपूजा, त्रिरत्न वंदना, आनापान ध्यान, धम्मदेसना, बुद्ध-भीम गीतांचा कार...
error: Content is protected !!