तेलंगणा

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आदिलाबाद स्थानकावर पायाभूत कामांना गती; RUB व FOB प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

आदिलाबाद स्थानकावर पायाभूत कामांना गती; RUB व FOB प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड रेल्वे विभागाची उल्लेखनीय कामगिरी; प्रवाशांच्या सुरक्षिततेत होणार वाढ नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आदिलाबाद स्थानकावर दोन महत्त्वाची पायाभूत सुविधा संबंधित कामे यशस्वीपणे पूर्ण करत गती शक्ती युनिटच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. या कामांदरम्यान रेल्वे वाहतुकीत कमीत कमी अडथळा येईल याची विशेष दक्षता घेण्यात आली. मार्च महिन्याच्या अखेरीस आदिलाबाद स्थानक यार्डमध्ये लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 30 ऐवजी प्रस्तावित रोड अंडर ब्रिज (RUB) बांधकामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या अंतर्गत 26.8 मीटर लांबीचा RH गर्डर ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान ट्रॅकखाली बसवून त्यानंतर प्रीकास्ट RCC बॉक्स सेगमेंटच्या साहाय्याने मजबूत संरचना उभारण्यात आली. या प्रक्रियेत ट्रॅकखाली दोन व्हेंट असलेला RUB तयार करण्यात आला. प्रत्येक व्हेंटमध्ये 1.50 मीटर रुंदीचे आठ RCC बॉक्स सेगमेंट...
उन्हाळी गर्दीसाठी कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस; नांदेड मार्गे धावणार

उन्हाळी गर्दीसाठी कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस; नांदेड मार्गे धावणार

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेने, दक्षिण मध्य रेल्वेच्या समन्वयाने, कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेमुळे दक्षिण व उत्तर भारतातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक 06181 कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 9 एप्रिल ते 4 जून 2026 या कालावधीत दर गुरुवारी पहाटे 2.30 वाजता कोयंबतूर येथून सुटून शनिवारी दुपारी 1.25 वाजता जयपूर येथे पोहोचेल. या दरम्यान एकूण 9 फेऱ्या होणार आहेत. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06182 जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 12 एप्रिल ते 7 जून 2026 या कालावधीत दर रविवारी रात्री 10.05 वाजता जयपूरहून सुटून बुधवारी सकाळी 8.30 वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. या गाडीच्याही 9 फेऱ्या नियोजित आहेत. या विशेष गाडीत 20 एलएचबी डबे असतील. त्यामध्ये 18 वातानुकूल...
नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज “डिजिटल अवेअरनेस डे” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम घेऊन प्रवाशांमध्ये डिजिटल पेमेंटबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम आणि आदिलाबादसह इतर स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत डिजिटल व्यवहारांचे फायदे, सुरक्षितता आणि सोय यांची माहिती दिली. आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत डिजिटल पेमेंटचा संदेश दिला. दरम्यान, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून तिकीट खरेदीसह रेल्वे सेवांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारून...
प्रवाशांसाठी दिलासा! विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ

प्रवाशांसाठी दिलासा! विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ

तेलंगणा, महाराष्ट्र, स्थानिक
नांदेड| प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, काही विशेष (Train on Demand - TOD) गाड्यांच्या धावण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्या पूर्वीप्रमाणेच विद्यमान थांबे व वेळापत्रकानुसार धावणार आहेत. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतवाढ मिळालेल्या विशेष गाड्या: गाडी क्र. 07605 तिरुपती – अकोला (शुक्रवार) : 10 एप्रिल 2026 पर्यंत गाडी क्र. 07606 अकोला – तिरुपती (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत गाडी क्र. 07015 नांदेड – तिरुचेंनुर (शनिवार) : 11 एप्रिल 2026 पर्यंत गाडी क्र. 07016 तिरुचेंनुर – नांदेड (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत गाडी क्र. 07189 नांदेड – धर्मावरम (शुक्रवार) : 10 एप्रिल 2026 पर्यंत गाडी क्र. 07190 धर्मावरम – नांदेड (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्य...
रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर

रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड/हिंगोली| मराठवाड्यातील तिरुपती बालाजी भक्तांसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे प्रवास करताना अनेकदा बदल करावे लागतात, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात. विशेषतः वयोवृद्ध आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी हजारो भाविक तिरुपतीला दर्शनासाठी जात असल्याने, या भागातून थेट रेल्वे सेवा सुरू होणे ही दीर्घकालीन गरज बनली आहे. रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार झाल्यास प्रवाशांना अधिक सु...
नांदेड रेल्वे विभागाची विक्रमी कामगिरी; तिकीट तपासणीतून ₹14.95 कोटी महसूल

नांदेड रेल्वे विभागाची विक्रमी कामगिरी; तिकीट तपासणीतून ₹14.95 कोटी महसूल

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तिकीट तपासणी महसूलात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष मोहिमांच्या माध्यमातून विभागाने तब्बल ₹14.95 कोटी महसूल प्राप्त केला असून, हा आकडा मुख्यालयाने दिलेल्या ₹14.80 कोटी उद्दिष्टापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष संपण्यास तीन दिवस बाकी असताना, म्हणजेच 28 मार्च 2026 रोजीच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. यावरून तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची मेहनत, तत्परता आणि कार्यक्षमता अधोरेखित होते. ही कामगिरी मागील वर्षातील (2024–25) ₹12.59 कोटींच्या विक्रमालाही मागे टाकणारी ठरली आहे. एका दिवसातील सर्वाधिक महसूल: ₹10.90 लाख (17 ऑक्टोबर 2025) महिन्यातील सर्वोत्तम महसूल: ₹1.55 कोटी (ऑक्टोबर 2025) रेल्वे गाड्या व स्थानकांवर राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमा, सुसूत्र नियोज...
error: Content is protected !!