क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

सगरोळी हादरले! रेतीच्या भरधाव ट्रकने घेतला निरपराधाचा बळी

सगरोळी हादरले! रेतीच्या भरधाव ट्रकने घेतला निरपराधाचा बळी

क्राइम
बिलोली, गोविंद मुंडकर| शनिवार दिनांक 16 सकाळी सुमारे १०:४५ वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील अनुसया नगर भागाच्या पायथ्याशी शनिवारी सकाळी भीषण अपघात घडून एका सुमारे ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीच्या ट्रकने विठ्ठल लवटे (रा. अनुसया नगर, सगरोळी) यांना जोरदार धडक देत चिरडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली असून, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक अत्यंत वेगात होता आणि गावातील मुख्य रस्त्यावरून कोणतीही खबरदारी न बाळगता धावत होता. यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामु...
हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

क्राइम
निष्काळजीपणाचा आरोप; परिसरात हळहळ व्यक्त नांदेड/हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. सक्षम गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम नागराज गायकवाड हा किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलमधील भिसी गावचा रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी लग्नसमारंभ साठी हिमायतनगर येथे आला होता. दरम्यान, स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा हट्ट केल्याने आई त्याला घेऊन गेली होती. मात्र पोहत असताना पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिमुकल्याच्या आईने रुग्णालयात धाय मोकलून आक्रोश केला. “पोटचा गोळा” गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही घटना पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले. दरम्यान, ...
मेव्हण्याच्या लग्नासाठी आलेल्या जावयाने केली पत्नीची हत्या; नंतर स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

मेव्हण्याच्या लग्नासाठी आलेल्या जावयाने केली पत्नीची हत्या; नंतर स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

क्राइम
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांड्यातील हृदयद्रावक घटना हिमायतनगर | मेव्हण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीची चाकूने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तिन्ही लहान मुले पोरकी झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पायल विनोद राठोड (वय ३५) व पती विनोद रंगराव राठोड (वय ४०, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) हे आपल्या तीन मुलांसह बोरगडी तांडा नं. १ येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. लग्नसमारंभात दोघेही आनंदात वावरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, दिनांक 11 च्या मध्यरात्रीच्या सुमारास विनोद राठोड यांनी पत्नीला घराबाहेर बोलावून काही अंतरावर नेले आणि धारदार चाकूने तिच्यावर वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला...
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४३.४८ लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४३.४८ लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

क्राइम
नांदेड| ऑपरेशन “क्रॅक डाऊन” अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्यावर धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार दिनांक ६ मे रोजी रात्री ११.१५ वाजल्यापासून ७ मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत बळीरामपूर व गुरूरामदास नगर परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिसांना बळीरामपूर येथे एक संशयित इसम कमरेला तलवार व खंजर बाळगून आढळला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिजीत गिरीधर सातपुते, रा. बळीरामपूर असे सांगितले. तसेच ही शस्त्रे गुरू रामदास नगर येथून विकत घेतल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गुरू रामदास नगर येथे छापा टाकला असता एक संशयित इसम ...
जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण जेरबंद, १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण जेरबंद, १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ५ मे रोजी सायंकाळी लिमरा हिल्स कॉलनी परिसरात, बंधारा ब्रिजजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर...
ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत गावठी कट्टा जप्त; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत गावठी कट्टा जप्त; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना इतवारा परिसरातील पहेलवान टी हाऊस जवळ एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला ...
ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; १५.९८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; १५.९८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधीत जर्दा असा तब्बल १५ लाख ९८ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली. मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला नांदेड शहरातील चुनाभट्टी परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चुनाभट्टी येथील पोल्ट्रीफॉर्म मागील घरावर छापा टाकला...
नांदेड विमानतळ हद्दीत घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड विमानतळ हद्दीत घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आरोपींकडून सुमारे ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख नईम शेख महेबुब (वय २२, रा. माळटेकडी, म्हाळजा, नांदेड) व शेख रहेमान उर्फ भेंडी शेख अशपाक (वय १९, रा. मखदुम नगर, नई आबादी, नांदेड) अशी ...
खडकपुरा भागात अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल:

खडकपुरा भागात अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल:

क्राइम
नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मागील काही दिवसांपासुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत होती. परंतु काल दि.०४.०५.२०२६ रोजी खडकपुरा वाघी रोड येथे जमावाने अतिक्रमणची कारवाई चालु असताना महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर पालिका प्रशासनाने वजिराबाद पोलीस स्टेशन येथे तातडीने गुन्हा दाखल करून पुन्हा त्याच ठिकाणी फौजफाट्यासह धडक कारवाई करत वाघी रोडवर महापालिकेने २ जेसीबीच्या सहाय्याने एकुण ५० ते ६० अतिक्रमण धारकावर धडक कारवाई करत अतिक्रणाचा सफाया केला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली जात आहे. सोमवार दि.०४.०५.२०२६ रोजी अतिक्रमण विभागाचे पथक कलामंदिर ते मिल रोड व त्यानंतर ख...
धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल

धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर यांनी अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर तसेच धर्माबाद आणि बिलोली येथील मराठवाडा जनहित पक्षाविरोधात सीबीआय कार्यालयासमोरून केलेल्या कथित आरोपांमुळे बिलोली शहर व तालुक्यात मोठे पडसाद उमटले आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता बिलोली येथे संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या संदर्भात बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत बेळकोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आरोपांमुळे सार्वजनिक जीवनात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, सुरेंद्र बेळकोणीकर यांनी नेमके कोणते आरोप केले, त्यामागील तथ्य काय आहे, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर प्रसारि...
error: Content is protected !!