क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बेमुदत साखळी उपोषण

विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बेमुदत साखळी उपोषण

क्राइम
नांदेड | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या २४ जणांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागण्यांसाठी सीटू कामगार संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ जुलैपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांना जबाबदार धरून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नांदेड विभागीय उपायुक्त बाबू हमीद तडवी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेले ताडी दुकान बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा आणि विविध गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विभागीय, खातेनिहाय तसेच मालमत्तेची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आ...
नेवरी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह वांरगा फाट्याजवळ आढळला

नेवरी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह वांरगा फाट्याजवळ आढळला

क्राइम
घातपात की अपघात? शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष हदगाव, गौतम वाठोरे |हदगाव तालुक्यातील नेवरी येथील बेपत्ता युवक प्रशांत देवराव इंगळे (वय ३८) यांचा मृतदेह रविवारी (दि. १२) आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हदगाव–वांरगा मार्गावरील वांरगा फाट्याजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की घातपातामुळे, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. प्रशांत इंगळे हे शेतीसोबतच शेतीमालाच्या खाजगी व्यापाराचा व्यवसाय करत होते. दि. ९ जुलै रोजी ते कोळी (ता. हदगाव) येथे नातेवाईकांच्या विवाहसमारंभासाठी गेले होते. समारंभानंतर ते दुचाकीने नांदेड येथील राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने हदगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार...
विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत रक्तरंजित थरार; तरुणाची चाकूने हत्या, नांदेडमध्ये खळबळ

विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत रक्तरंजित थरार; तरुणाची चाकूने हत्या, नांदेडमध्ये खळबळ

क्राइम
नांदेड | नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी मध्यरात्रीनंतर एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृत तरुणाची ओळख सचिन यशवंत काळे (वय २४–२५, रा. नुरी चौक, नांदेड) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सचिन यांच्यावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सचिन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जब...
हिमायतनगर हादरले; एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक एन. टी. जाधव यांची आत्महत्या

हिमायतनगर हादरले; एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक एन. टी. जाधव यांची आत्महत्या

क्राइम
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व आणि एकलव्य स्टडी सर्कल या नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक एन. टी. जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एन. टी. जाधव हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तप्रिय, अभ्यासू आणि मनमिळाऊ शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करून यशाचा मार्ग दाखविला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच भाऊ, आई असा परिवार आहे. दरम्यान, त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस या...
नांदेड पोलिसांचा धाडसी छापा; ३७ प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त

नांदेड पोलिसांचा धाडसी छापा; ३७ प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त

क्राइम
नांदेड| भारतात विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या मोठ्या साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३७ ते ३८ प्रकारची प्रतिबंधित उत्पादने जप्त केली आहेत. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून, यामुळे अवैध सौंदर्य प्रसाधनांच्या व्यापाराचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदेड पोलिसांनी 'अफ्रा जनरल स्टोअर्स' या दुकानावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आढळून आली. प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ५० ते ६० लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये आरोग्यास घातक ठरू शकणारे घटक असल्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या मदतीने नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्...
आरक्षण उपवर्गीकरणावर सरकार सकारात्मक; लवकरच सर्व समाज प्रतिनिधींसोबत बैठक – गिरीश महाजन

आरक्षण उपवर्गीकरणावर सरकार सकारात्मक; लवकरच सर्व समाज प्रतिनिधींसोबत बैठक – गिरीश महाजन

क्राइम
मुंबई | अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, अतिवृष्टीची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व ५८ समाजांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन व संसदीय कार्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. धर्माबाद ते मुंबई अशी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने काढण्यात आलेल्या महापदयात्रेनंतर आंदोलनाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. एवढ्या पावसात काढलेल्या पदयात्रेतून आंदोलनकर्त्यांची तळमळ आणि संघर्ष दिसून येतो, असे सांगत त्यांनी सर्वांना सुरक्षितपणे घरी परतण्याचे आवाहनही केले. यावेळी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने जाहीर करण्याची मागणी केली. या मागणीसाठी गेली ३५ वर्षे सातत...
बंदी घातलेल्या गुटख्यावर वजिराबाद पोलिसांचा धडक छापा; दोन विक्रेत्यांना बेड्या

बंदी घातलेल्या गुटख्यावर वजिराबाद पोलिसांचा धडक छापा; दोन विक्रेत्यांना बेड्या

क्राइम
नांदेड | नांदेड शहरात बंदी घातलेल्या गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात वजिराबाद पोलिसांनी प्रभावी कारवाई करत दोन विक्रेत्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ₹31,292 किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना जेल रोड परिसरातील भोला पान शॉपमध्ये बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकत दुकानाची झडती घेतली. या कारवाईत आकाश अनिल शेटे (२४) व अविनाश अनिल शेटे (२२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान गुटखा, सुगंधित तंबाखू, चुना तसेच मिश्रित खर्रा असा एकूण ₹31,292 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 351/2026 नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, ...
लोहा शहराच्या शांततेला गोळीबाराचे गालबोट; वाढती नशाबाजी, टवाळखोरांचे टोळके आणि पालकांसमोर नवे आव्हान

लोहा शहराच्या शांततेला गोळीबाराचे गालबोट; वाढती नशाबाजी, टवाळखोरांचे टोळके आणि पालकांसमोर नवे आव्हान

क्राइम
लोहा| लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहराच्या शांततेला गालबोट लागले आहे. पती-पत्नीतील वादातून एका तरुणाने अवैधरित्या मिळवलेल्या गावठी पिस्तुलातून पत्नीवर गोळीबार केल्याची घटना घडली. लोह्याच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात असून, वाढती नशाबाजी, तरुणांमधील बेशिस्त वर्तन आणि सामाजिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी केंद्र म्हणून लोहा शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, या घटनेमुळे शहराच्या सुरक्षित प्रतिमेला धक्का बसला आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या सुटल्यानंतर मुलींचा पाठलाग करणाऱ्या टवाळखोरांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याची गरज असून, पालकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे ल...
चोरीच्या गुन्ह्यातील दोन महिला आरोपींकडून २४ लाखांचे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

चोरीच्या गुन्ह्यातील दोन महिला आरोपींकडून २४ लाखांचे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

क्राइम
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई नांदेड | नांदेड जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत दोन महिला आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २४ लाख रुपये किमतीचे १६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील १६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मी गणेशराव साखरे उर्फ मंजू रेड्डी (वय ४६) आणि पूजा सोनु उर्फ लक्केपा साखरे (वय २६) या दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्य...
देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबालाच मुलाने घातला दगा! दोन दिवसांत घरफोडीचा पर्दाफाश

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबालाच मुलाने घातला दगा! दोन दिवसांत घरफोडीचा पर्दाफाश

क्राइम
मुलगा व विधिसंघर्षग्रस्त बालिकेकडून ₹9.36 लाखांची रोख रक्कम जप्त नांदेड | नायगाव येथील घरफोडीच्या गाजलेल्या गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून धक्कादायक सत्य समोर आणले आहे. घरफोडीच्या कटाचा सूत्रधार दुसरा-तिसरा कोणी नसून फिर्यादीचाच मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. त्याने एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेच्या मदतीने घरातील ₹9 लाख 70 हजारांची रोकड लंपास करण्याचा कट रचल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी ₹9 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपास...
error: Content is protected !!