सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा हिमायतनगरात संताप; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह व असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

oplus_16

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी, राजकीय विरोध असला तरी महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगितले. महिलांचा सन्मान अबाधित राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा प्रकारच्या कथित वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

oplus_16

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर, युवक विधानसभा अध्यक्ष अभिलाष जयस्वाल, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, युवक अध्यक्ष शितलभाऊ शेवनकर, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बाबा खान, जुनेदभाई कंपनी, शेख अफरोज, सलीम शेवालकर, माजीद कुरेशी, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, ओमकार चलर्मिलवार, रवी राठोड, जाबेद खान, संतोष साबळकर, सदाभाऊ काळे, लालू टेक्केवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!