
पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच महिलेची चेअरमनपदी बिनविरोध निवड; नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड
देगलूर, गंगाधर मठवाले| श्रीराम सहकारी पतसंस्था, देगलूरच्या अध्यक्षपदी सौ. सुजाता शिवाजी जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची अध्यक्षपदी निवड झाल्याने या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


पतसंस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी सौ. सुजाता शिवाजी जाधव, उपाध्यक्षपदी सुभाष इंगोले, सचिवपदी गणेश कदम तर कोषाध्यक्षपदी चंद्रकांत गोविंदवार यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.


यावेळी देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर, एल. वाय. शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते तथा नांदेड जिल्हा शिक्षण समितीचे माजी स्वीकृत सदस्य जीवनराव पाटील वडजे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठलराव वडजे, जिल्हा नेते नरसिंग सोनटक्के, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मन्यार साहेब, शिक्षण सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सुधाकर थडके, शिक्षक नेते व्यंकटराव जाधव, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा नेते प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस बालाजी वडजे, शिक्षण सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय अंबुरे,


शिक्षक नेते चामावर सर, मुंडकर सर, मोहनावती सहकारी पतसंस्था मुखेडचे संचालक ज्ञानेश्वर अप्पाने, यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अजित पाटील कदम, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे देगलूर तालुकाध्यक्ष विठ्ठल रेड्डी पांगरे, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते दादाराव पाटील, शिक्षक सेनेचे नेते श्रीरंग बिरादार, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते संजय पांचाळ, शिवाजी पाटील, सेवानिवृत्त शिक्षक कोसंबे सर, तानाजी पाटील, इंगोले, चव्हाण सर, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी यांनी केले. प्रास्ताविक यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बिरादार यांनी केले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून संस्थेच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे माजी चेअरमन सुभाष चोंडीकर सर, शितल भालेवार सर, राहुल भाले सर तसेच सर्व संचालक मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार पतसंस्थेच्या उपाध्यक्षांनी मानले. श्रीराम सहकारी पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच महिलेने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याने महिला नेतृत्वाला मिळालेली ही संधी देगलूरच्या सहकार व शिक्षक क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरली आहे.
