शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

शेती
नायगाव| मांजरम येथील निजामकालीन खंडगाव पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी स्थळ पाहणीदरम्यान दिले. राज्य शासनाच्या बळीराजा पांदण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते उपलब्ध करून देण्याचे काम राज्यभर सुरू असून, मांजरम येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडगाव पांदण रस्ताही याच योजनेतून विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले की, संबंधित पांदणाची लवकरच सरकारी मोजणी करण्यात येणार असून अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना शेतीसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी मंडल अधिकारी राठोड मॅडम, तलाठी अनुपवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकरी नेत्यांचा इशारा यावेळी शेतकरी नेते पांडुरंग देवराव शिंदे यांनी सांगितल...
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हिमायतनगर तालुक्याला तडाखा; पारवा खुर्द येथे घराचे छत उडाले

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हिमायतनगर तालुक्याला तडाखा; पारवा खुर्द येथे घराचे छत उडाले

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी वातावरणामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, हळद, आंबा यासह फळबागां उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील पारवा खुर्द येथे दिनांक 8में रोजी दुपारी झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान शिवाजी काशिनाथ सूर्यवंशी यांच्या घराचे संपूर्ण छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे घरातील साहित्याचेही नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागा, वैरण तसेच हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक धोक्यात आले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकस...
पेठवडज येथे वादळी वाऱ्यासह गारपीट : फळ पिकांचे प्रचंड नुकसान.!

पेठवडज येथे वादळी वाऱ्यासह गारपीट : फळ पिकांचे प्रचंड नुकसान.!

शेती
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील पेठवडज सह काही गावांमध्ये झालेल्या गारपीटीमध्ये फळबागेचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घालत अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून ऐकावस मिळत आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे सर्वसामान्य जनतेची एकच धांदल उडाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ७ मे गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास अचानक हवामानामध्ये बदल होत थंड वारे सुरू झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी एक ते दीड च्या दरम्यान पेठवडजसह गोणार, शिरशी बुद्रुक, शिरशी खुर्द, कलाळी, मंगनाळी, या गावासह अनेक गावांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट होऊन शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील आंबा, चिकू, टरबूज या फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिक...
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

शेती
नांदेड| यंदाच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले आहेत. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे. पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या निर्देशानुसार हा आराखडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात तसेच नदीकाठच्या जमिनींवर विशेष चारा लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देण्यात येणार असून, चारा साठवणुकीवरही भर दिला जाणार आहे. पशुपालकांसाठी चारा साक्षरता अभियान राबवून कडबा...
केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष दिलासा

केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष दिलासा

शेती
नवी दिल्ली| महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे या निर्णयामुळे सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सुरक्षा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य व हमीभाव मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याबरोबरच खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी वेळेत आपला माल विकू शकले नाहीत, त्यांनाही आता या आधारभूत किंमतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे....
मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शेती
नांदेड| जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उष्णतेमुळे अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्र...
एचटीबीटी कपाशी बियाण्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश

एचटीबीटी कपाशी बियाण्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश

शेती
नांदेड| जिल्ह्यात एचटीबीटी कपाशी बियाण्यांची साठवणूक, वाहतूक व विक्री यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले आहेत. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करून पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कापूस लागवडीची तयारी करत असताना बाजारात अनधिकृत व बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी महसूल, कृषी व पोलीस विभागाच्या समन्वयातून जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी किडरोग सल्ला प्रकल्पाचे पुनर्रचना, दक्षता पथकाची स्थापना, तसेच कपाशी पिकातील तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना लहान यंत्रे उपलब्ध करून देणे व त्याचा प्रसार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, क्षेत्रीय स्तरावर पथकांमार्फत तपासणी मोहीम राबविण्याचेही आद...
पांदण रस्त्यासह विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना – तहसीलदार विठ्ठल परळीकर

पांदण रस्त्यासह विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना – तहसीलदार विठ्ठल परळीकर

शेती
लोहा/माळाकोळी| शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महास्वराज अभियानांतर्गत पांदण रस्त्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत असून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली. माळाकोळी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल (राजस्व) अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नायब तहसीलदार अशोक मोकले, श्री पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडे, उपअभियंता (पाणीपुरवठा) दीपक बनसोडे, ग्राम महसूल अधिकारी भुमेश्वर विभुते, कनिष्ठ अभियंता श्री कराड, सरपंच जनार्धन तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, गणपत तिडके, पांडुरंग नागरगोजे, हनमंतराव खेडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. परळीकर म्हणाले की, शेती, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकां...
नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर

नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर

शेती
नांदेड | प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावत पहिल्या टप्प्यात तब्बल ८१३.९३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय, सूक्ष्मनियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, एकूण मंजुरी ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकरी या योजनेत विमाधारक असून, एकूण ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल झाले होते. सुमारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असून, ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असल्याची नोंद आहे. यासाठी ३३१२ पीक कापणी प्रयोग करण्यात आले आहेत. सध्या २१ महसूल मंडळांची रक्कम प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कापणी प्रयोगांची वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्य...
फार्मर आयडी नोंदणीबाबत महत्त्वाचे आवाहन ; २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा

फार्मर आयडी नोंदणीबाबत महत्त्वाचे आवाहन ; २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा

शेती
पुणे| राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यातील एकूण १.७१ कोटी खातेदारांपैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अद्याप काही शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर (CSC) भेट देऊ शकतात किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी २० मे २०२६ पूर्वी आ...
error: Content is protected !!