Tag: निधन

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

सामाजिक
वयाच्या १०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील जेष्ठ नागरिक संभाजीराव माधवराव शिंदे पळसपुरकर यांचे गुरुवार, दि. 14 रोजी सायंकाळी ठीक 8 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 105 वर्षे होते. संभाजीराव शिंदे हे शांत, संयमी व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने पळसपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, तीन मुली, सुना, नातू, नाती तसेच पणती असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. 15 रोजी सकाळी ठीक 10 वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
विठ्ठलराव संभाजी हरडफकर यांचे निधन; आज अंत्ययात्रा

विठ्ठलराव संभाजी हरडफकर यांचे निधन; आज अंत्ययात्रा

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक कै. विठ्ठलराव संभाजी हरडफकर (कदम) यांचे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरातून श्री संभाजी राजे हॉस्टेल येथून निघणार असून, अंत्यसंस्कार वैैकुंठधाम स्मशानभूमी, लकडोबा चौक, हिमायतनगर येथे करण्यात येणार आहेत. स्व. विठ्ठलराव हरडफकर यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार असून, त्यांच्या निधनाने समाजातील एक जेष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐...
द्रोपताबाई रामजी अनगुलवार यांचे निधन

द्रोपताबाई रामजी अनगुलवार यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सवना ज. येथील रहिवासी द्रोपताबाई रामजी अनगुलवार (वय ८२) यांचे सोमवारी सकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, तसेच पोशट्टी अनगुलवार व संतोष अनगुलवार यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यसंस्कार आजच दुपारी ४.२० वाजता करण्यात येणार आहे. स्व. द्रोपताबाई अनगुलवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. 💐🙏...
संगीतविश्वाला मोठा धक्का: आशा भोसले यांचे निधन

संगीतविश्वाला मोठा धक्का: आशा भोसले यांचे निधन

करियर
मुंबई | भारतीय संगीतविश्वातील महान पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल 2026) मुंबईत निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्याधिक थकवा, छातीत इन्फेक्शन तसेच हृदय व श्वसनासंबंधी गुंतागुंतींमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा आनंद भोसले यांनी दिली असून, उद्या सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी शिवाजी पार्क येथे होणार आहेत. आठ दशकांची सुवर्ण कारकीर्द आशा भोसले यांनी 1940च्या दशकात आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली आणि हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांचा आवाज, बहुविध शैली आणि अद्वितीय गायकीमुळे त्या भारतीय संगीताचा अविभाज्य भाग बनल्या. संगीतविश्वात शोककळा त्यांच्या निधनाने भारत...
परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

धर्म अध्यात्म
नांदेड (प्रतिनिधी) समाजप्रबोधनाची अखंड ज्योत चेतवणारे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आणि नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शि.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे नुकत्याच झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाज जागृतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांच्या विचारांचा दीप आजही अनुयायांच्या मनामनात प्रज्वलित आहे. संत परंपरेचा वारसा जपत, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या भक्तीभावातून तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्य समाजपरिवर्तनासाठी अर्पण केले. ‘शिवधर्म’ पद्धतीने अंत्यसंस्कार १ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील बारूळ (मानार धरण परिसर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘शिवधर्म’ पद्धतीन...
सारजाबाई ठाकुर यांचे निधन; सरसम बु. गावावर शोककळा

सारजाबाई ठाकुर यांचे निधन; सरसम बु. गावावर शोककळा

स्थानिक
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री वामनराव मोरे ठाकुर महाराज यांच्या मातोश्री सारजाबाई रामचंद्र मोरे ठाकुर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे, सुना व नातसुना असा मोठा परिवार आहे. सारजाबाई या शांत, सोज्वळ व आपुलकीने वागणाऱ्या जुन्या पिढीतील आदर्श गृहिणी होत्या. साधी राहणी, नीटनेटकेपणा, डोक्यावर पदर आणि आदरयुक्त बोलणे ही त्यांची ओळख होती. कुणालाही दुखावू नये, हीच त्यांची जीवनशैली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सरसम (बु.) येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. ..भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏ॐ शांती 🌺...
error: Content is protected !!