
वयाच्या १०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील जेष्ठ नागरिक संभाजीराव माधवराव शिंदे पळसपुरकर यांचे गुरुवार, दि. 14 रोजी सायंकाळी ठीक 8 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 105 वर्षे होते.


संभाजीराव शिंदे हे शांत, संयमी व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने पळसपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, तीन मुली, सुना, नातू, नाती तसेच पणती असा मोठा परिवार आहे.


ते पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. 15 रोजी सकाळी ठीक 10 वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.


