वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड | रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आयोजित विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
"वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून सुरक्षित वाहतूक ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच रस्ता सुरक्षेचे नियम अंगीकारून जबाबदार नागरिक बनावे," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळेतील विज्ञान विभा...









