केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर
शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड|मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला असून, या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा ...









