क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आरपीएफ नांदेडची सतर्क कारवाई; संशयितांना ताब्यात तर ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ४.६० लाखांचे सामान परत

आरपीएफ नांदेडची सतर्क कारवाई; संशयितांना ताब्यात तर ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ४.६० लाखांचे सामान परत

क्राइम
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तत्परता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत केली असून प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. पहिल्या घटनेत, रात्र गस्तीदरम्यान पूर्णा व परभणी येथील आरपीएफ तसेच जीआरपी पथकाने पोखरणी नरसिंहा रेल्वे स्थानकाजवळ गंगाखेड बाजूकडील होम सिग्नल परिसरात दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. मध्यरात्री सुमारे १२:३० वाजता हे दोघे संशयास्पद हालचाली करताना आढळले. चौकशीत त्यांनी आपली नावे राजू व छगन (दोघेही रा. परभणी) अशी सांगितली. संशयास्पद वर्तन लक्षात घेता पुढील कारवाईसाठी त्यांना जीआरपी परळी यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. दुसऱ्या घटनेत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफने प्रवाशांचे हरवलेले मौल्यवान...
विमानतळ पोलिसांची धडक कारवाई; अवैध खंजरासह तिघे ताब्यात, गुन्हे दाखल

विमानतळ पोलिसांची धडक कारवाई; अवैध खंजरासह तिघे ताब्यात, गुन्हे दाखल

क्राइम
नांदेड | शहरात सुरू असलेल्या स्ट्रिट सेफ्टी मोहिमेदरम्यान विमानतळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध खंजर बाळगून संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे विमानतळ येथे गु.र.नं. 175/2026 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच गु.र.नं. 176/2026 अंतर्गत कलम 122 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत फिर्याद पोलीस कर्मचारी हाणमंत माधवराव पाकलवाड यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान माळटेकडी ब्रिज परिसरात एक इसम अवैध हत्यारासह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित सुनिलसिंग दर्शनसिंग दुधानी (रा. भारत कॉलनी, अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी खंजर जप्त करण्यात आला. तसेच पुढील ...
नांदेड : ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघे जेरबंद

नांदेड : ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघे जेरबंद

क्राइम
नांदेड| शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गाजलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीसह आणखी एक आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) नांदेड यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 172/2026 अंतर्गत विविध कलमांन्वये नोंद असलेल्या या प्रकरणातील आरोपी साई ऊर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार (वय 26) आणि नितेश परमेश्वर इंगळे (वय 22, दोघेही रा. नांदेड) हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री कॅनल रोड परिसरात जुना वाद उफाळून आल्याने प्रफुल उर्फ अजितसिंग गजानन चक्षाण यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथके तयार करून आरोपींचा शो...
परभणीत पोलीस उप महानिरीक्षक पथकाच्या धाडी; मटका अड्ड्यांवर कारवाई, दहा आरोपी जेरबंद

परभणीत पोलीस उप महानिरीक्षक पथकाच्या धाडी; मटका अड्ड्यांवर कारवाई, दहा आरोपी जेरबंद

क्राइम
परभणी/नांदेड| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परभणी शहरात धाडसी कारवाई केली. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून एकूण दहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता मार्केट व जुना मोंढा परिसरात शटरआड सुरू असलेल्या मटका व्यवसायावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत २४,९९० रुपयांची रोकड व सुमारे २५ हजार रुपयांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर रासवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्मशानभूमी रोडवरील एम.आर. हॉटेल येथेही मटका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. येथे ७,९२० रुपयांची रोकड व ११...
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा, ४.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा, ४.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस यांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान छापा टाकत पाच जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तब्बल ४ लाख ७२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाउन’ अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरापासून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. २३ एप्रिल रोजी पहाटे सुमारे १२.२० वाजता वाजेगाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाजेगाव–मुदखेड रोडवरील आर.के. पेट्रोल पंपाजवळ मुरादकोल डेपोसमोरील मोकळ्या जागेत छापा टाकला. येथे काही इसम ‘तिरट’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगा...
आरपीएफ नांदेडची दुहेरी कारवाई; चोरी प्रकरणातील आरोपी अटक

आरपीएफ नांदेडची दुहेरी कारवाई; चोरी प्रकरणातील आरोपी अटक

क्राइम
हरवलेली अल्पवयीन मुलगी सुरक्षित परत नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे दोन स्वतंत्र कारवायांद्वारे महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या कारवायांमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेचे संरक्षण याबाबतची दक्षता पुन्हा अधोरेखित झाली आहे. अल्पवयीन मुलगी आईच्या स्वाधीन ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” अंतर्गत 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातील महिलांच्या प्रतीक्षालयात सुमारे 16 वर्षांची मुलगी एकटी बसलेली आढळली. महिला कॉन्स्टेबल छोटी पुनिया आणि जीआरपीचे हेड कॉन्स्टेबल पंकज दिघोळे यांनी तिला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी जीआरपी पोलीस ठाण्यात नेले. चौकशीनंतर तिच्या आईशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक पडताळणी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी सुरक...
गुरुद्वारा परिसरात 17 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई; ₹8,300 दंड वसूल

गुरुद्वारा परिसरात 17 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई; ₹8,300 दंड वसूल

क्राइम
नांदेड| शहरातील गुरुद्वारा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मोठी कारवाई केली. कोटपा (COTPA) 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 21 एप्रिल 2026 रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत एकूण 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करत ₹8,300 दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी तपासणी केली. पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड, एमजीव्हीएसचे मंगेश गायकवा...
खून प्रकरणी आरोपीस १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

खून प्रकरणी आरोपीस १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्त मजुरी व द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. दि. २३ जून २०२१ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी केदारनाथ तुकाराम बुलबुले (वय ३०, रा. चोरंबा, ता. हदगाव) याने फिर्यादीच्या मुलीवर मारहाण करून तिचा खून केल्याची घटना उघड झाली होती. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५६/२०२१ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तौशीकर यांनी सुनावणीदरम्यान पुरावे ग्राह्य धरून आरोपीस भा.दं.वि. कलम ३०४ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक...
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; २५,९०० रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; २५,९०० रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करून २५,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गु.र.नं. १७२/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ (कलम 8(क), 20) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ एप्रिल रोजी सायंकाळी भाजी मंडई, दातार चौक परिसरात करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेजने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. छाप्यामध्ये आरोपी मोहम्मद मुजाहीद मोहम्मद इशरत (वय २०, रा. भाजी मंडई, दातार चौक, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा (किंमत अंदाजे २५,००० रुपये) तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक इरफान युनुस सय्यद व त्यांच्या पथकाने ही कारवा...
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; १३.४० लाखांचा गांजा जप्त, १७ जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; १३.४० लाखांचा गांजा जप्त, १७ जणांविरुद्ध गुन्हा

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध गांज्याच्या तस्करीवर मोठी कारवाई करत १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गु.र.नं. 433/2026 अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ (कलम 20(B), 22(B), 25) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई चंदनसिंग कॉर्नर येथे २२ एप्रिल रोजी पहाटे २.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. नाकाबंदी दरम्यान देगलूरकडून नांदेडकडे येणारी एक संशयित Maruti Dzire कार (TS09UC-6085) थांबवून तपासणी केली असता डिकीत २२ किलो वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी सुमारे ४.४० लाख रुपये किंमतीचा गांजा व ९ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण १३.४० लाखां...
error: Content is protected !!