खून प्रकरणी आरोपीस १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

नांदेड (प्रतिनिधी) अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्त मजुरी व द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.

दि. २३ जून २०२१ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी केदारनाथ तुकाराम बुलबुले (वय ३०, रा. चोरंबा, ता. हदगाव) याने फिर्यादीच्या मुलीवर मारहाण करून तिचा खून केल्याची घटना उघड झाली होती. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५६/२०२१ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तौशीकर यांनी सुनावणीदरम्यान पुरावे ग्राह्य धरून आरोपीस भा.दं.वि. कलम ३०४ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने मोहम्मद अब्बास यांनी बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून गुटूलवाड यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित खटल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी “ट्रायल मॉनिटरिंग सेल” स्थापन करण्यात आला आहे.

या प्रकरणातील यशस्वी तपास व प्रभावी पैरवीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!