राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हदगाव येथे वीज समस्यांवर आढावा बैठक; तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश

हदगाव येथे वीज समस्यांवर आढावा बैठक; तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश

राजकारण
हदगाव (प्रतिनिधी) नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSCB) च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत निवघा, तळणी, हदगाव, ल्याहरी, आष्टी तसेच हिमायतनगर तालुक्यातील विविध फीडर संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वारंवार होणारी वीज खंडित होणे, जळालेल्या डीपी (ट्रान्सफॉर्मर), नवीन वीज खांब उभारणी तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्या चर्चेत घेण्यात आल्या. यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना देत सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीमुळे परिसरातील वीज समस्यांवर लवकरच तोडगा निघण्याची ...
भारतीय जनता पक्ष कडून ७४ जिल्हा प्रभारी जाहीर; नांदेड महानगरची धुरा निलंगेकरांवर

भारतीय जनता पक्ष कडून ७४ जिल्हा प्रभारी जाहीर; नांदेड महानगरची धुरा निलंगेकरांवर

राजकारण
नांदेड (प्रतिनिधी) आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षने राज्यभरात मोठे पाऊल उचलत ७४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, या निर्णयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. या बदलांमध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश आहे. महानगर प्रभारीपदी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड उत्तरची जबाबदारी किरण पाटील यांच्याकडे, तर नांदेड दक्षिणची धुरा रेखा कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नांदेडमधील भाजप संघटन अधिक मजबूत आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यभर संघटनात्मक बळकटीसाठी ही मोहीम राबवण्यात आली असून, प्रत्येक जिल्हा प्रभारी आपल्या अनुभव व नेतृत्वाच्या बळाव...
नारीशक्तीच्या सन्मानासाठी हिमायतनगरात शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसविरोधी आंदोलन

नारीशक्तीच्या सन्मानासाठी हिमायतनगरात शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसविरोधी आंदोलन

राजकारण
हिमायतनगर | महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व सहयोगी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात “नारीशक्ती के सन्मान में शिवसेना मैदान में” व “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. शितलताई भांगे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले, मात्र काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांनी त्यास विरोध केल्याने महिलांच्या हक्कांना बाधा पोहोचत आहे. हे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे आंदोलन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा संपर्क...
महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन

महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन

राजकारण
नांदेड| जागतिक लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक व क्रांतीयोगी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने कौठा येथील त्यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज (दि. १९ एप्रिल) सकाळी १० वाजता महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमहापौर दिपकसिंग रावत तसेच सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनीही महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ, कवी आणि लिंगायत संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांनी सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा पाया रचत जातिव्यवस्थेविरोधात लढा दिला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, भाजपा ...
“महिलांच्या हक्कांना विरोध करणाऱ्यांना जनता उत्तर देईल” — डॉ. सान्वी जेठवाणी

“महिलांच्या हक्कांना विरोध करणाऱ्यांना जनता उत्तर देईल” — डॉ. सान्वी जेठवाणी

राजकारण
नांदेड| देशातील महिलांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्र सरकारने मांडलेले संविधान (१३१वा दुरुस्ती) विधेयक, २०२६ लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्यामुळे अपयशी ठरले आहे. या विधेयकाद्वारे महिलांसाठी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता. या संदर्भात प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांनाच विरोध करणे आहे. अशा प्रवृत्तीला जनता निश्चितच उत्तर देईल.” डॉ. जेठवाणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर टीका करत म्हटले की, “काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व महिलांच्या सक्षमीकरणाबाबत केवळ बोलते, पण प्रत्यक्ष कृतीत मात्र ते अपयशी ठरते. या विधेयकाला विरोध करून त्यांनी महिलांना ...
आगामी निवडणुकांसाठी माध्यम प्रतिनिधींवर कडक नियमावली

आगामी निवडणुकांसाठी माध्यम प्रतिनिधींवर कडक नियमावली

राजकारण
नवी दिल्ली| 2026 मधील आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने माध्यम प्रतिनिधींसाठी नवीन आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी वार्तांकनासाठी पत्रकारांना अधिकृत ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. तसेच आयोगाने अधिकृत मान्यता दिलेल्या माध्यम प्रतिनिधींना ‘अत्यावश्यक सेवा’ श्रेणीत समाविष्ट करून त्यांना टपाल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निवडणूक प्रक्रियेचे कव्हरेज करताना मतदान केंद्रांवरील प्रवेश निवडणूक नियम 1961 मधील तरतुदीनुसार काटेकोरपणे नियंत्रित केला जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींना परवानगीसाठी केंद्र सरकारच्या पत्र माहिती कार्यालय (PIB) किंवा राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत अर्ज करणे आवश्यक असेल. बहुस्तरीय पडताळणीनंतरच पात्र पत्रकारांना आयोगाकडून अधिकृत परवाना दिला जाईल. पारदर्शकता राखण्यासाठी फॅसिमाइल स्वाक्षरी किंवा रबर स्टॅम्प...
हदगावच्या राजकारणात ‘दिल्ली वारी’ची चर्चा; नगरसेवक अजय सूर्यवंशी यांनी घेतली खा. अशोक चव्हाणांची भेट

हदगावच्या राजकारणात ‘दिल्ली वारी’ची चर्चा; नगरसेवक अजय सूर्यवंशी यांनी घेतली खा. अशोक चव्हाणांची भेट

राजकारण
​विकासकामांच्या बहाण्याने राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न --- स्थानिक राजकारणात खळबळ हदगांव, गौतम वाठोरे| हदगावच्या स्थानिक राजकारणात सध्या 'सत्तेपेक्षा सलोख्याच्या राजकारणा'ची एक नवी व्याख्या पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नगरसेवक अजय सूर्यवंशी यांनी थेट देश राजधानी गाठत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे हदगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात मोठ्या राजकीय फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. ही भेट ​विकासाचा अजेंडा की राजकीय लॉबिंग असा प्रश्न सर्व सामान्यात पडला आहे. ​शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या नावाखाली ही भेट झाली असली, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ औपचारिक भेट नव्हती.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये बडे नेते आहेत त्यांनी नांदेड महानगरपालिकेवर पहिल्यांदाच 'कमळ' फुलले आहे. चव्हाणांच...
बिलोलीत स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट तांदूळ

बिलोलीत स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट तांदूळ

राजकारण
नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची कारवाईची मागणी बिलोली| तालुक्यातील तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित होत असल्याच्या तक्रारींना उधाण आले असून, यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मिळणारा तांदूळ तुटलेला, धुळकट असून काही ठिकाणी दगड-माती मिश्रित असल्याचे दिसून येते. तसेच काही वेळा तांदळाला दुर्गंधी येत असल्याने तो वापरण्यास अयोग्य ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने निकृष्ट धान्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती ...
घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा

घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा

राजकारण
घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. https://www.youtube.com/watch?v=eDLKW-ztygw&t=4s राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी थेट संपर्क साधून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यांना देयके देण्यात विलंब केला जात आहे. उलट अपूर्ण काम असलेल्या लाभार्थ्यांना “टेबलाखालून व्यवह...
महानगरपालिका कामकाजात गती आणा; स्वच्छतेत तडजोड नाही – महापौरांचे निर्देश

महानगरपालिका कामकाजात गती आणा; स्वच्छतेत तडजोड नाही – महापौरांचे निर्देश

राजकारण
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा महापौर कविता संतोष मुळे यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी घेतला. यावेळी शहरातील प्रलंबित नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीदरम्यान विविध क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील दैनंदिन कामकाज, प्रलंबित प्रकल्प तसेच स्वच्छता मोहिमेचा आढावा महापौरांसमोर सादर केला. शहरातील नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी कामकाजात गती आणावी आणि स्वच्छतेत सुसूत्रता ठेवावी, असेही महापौरांनी नमूद केले....
error: Content is protected !!