राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड विधान परिषदेत भाजपाचा झेंडा; अमरनाथ राजूरकर 339 मतांच्या भक्कम आघाडीने विजयी

नांदेड विधान परिषदेत भाजपाचा झेंडा; अमरनाथ राजूरकर 339 मतांच्या भक्कम आघाडीने विजयी

राजकारण
स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपाची ताकद पुन्हा सिद्ध; अमरनाथ राजूरकरांचा एकतर्फी विजय स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपाची एकहाती सरशी; विरोधकांचा दारुण पराभव नांदेड | नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी तब्बल 339 मतांच्या भक्कम आघाडीने विजय संपादन करत विरोधकांना धक्का दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी सकाळी मतमोजणी प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. मतमोजणीनंतर राजूरकर यांनी एकतर्फी विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला. निवडणुकीच्या रिंगणात भाजपाचे अमरनाथ राजूरकर, अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आणि प...
बंडानंतर नागेश आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया; “अविश्वासामुळेच निर्णय, विकासासाठी सत्तेची साथ गरजेची”

बंडानंतर नागेश आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया; “अविश्वासामुळेच निर्णय, विकासासाठी सत्तेची साथ गरजेची”

राजकारण
मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला निर्णय; कार्यकर्त्यांच्या नाराजीकडेही केले लक्षवेध "पक्षाकडून अविश्वास दाखवला गेला" असा आरोप विकासकामे रखडल्याने निर्णय घेतल्याचा दावा "विकासासाठी सत्तेत असणे आवश्यक" अशी भूमिका "मी कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच आलो" असा खुलासा नांदेड/हिंगोली | शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला असताना बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरीनंतर प्रथमच आपली भूमिका जाहीरपणे मांडली आहे. पक्ष नेतृत्वाकडून आमच्यावर अविश्वास दाखविण्यात आला, त्यानंतर पक्षात थांबून काहीही साध्य होणार नसल्याचे लक्षात आले. मतदारसंघातील विकासकामे रखडत असल्याने जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तीन दिवस नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून ...
हदगावच्या राजकारणात ट्विस्ट; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जवळगावकरांचे मोठे वक्तव्य

हदगावच्या राजकारणात ट्विस्ट; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जवळगावकरांचे मोठे वक्तव्य

राजकारण
भाजप प्रवेशाच्या चर्चांना जवळगावकरांचा ब्रेक; "मी काँग्रेसमध्येच, अफवांवर विश्वास ठेवू नका" हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच जवळगाव येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत, "मी काँग्रेस पक्षामुळेच आज या स्थानावर पोहोचलो आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही," अशी भूमिका मांडली. जवळगाव येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली मते व्यक्त केली. काहींनी जवळगावकर यांनी काँग्रेसमध्येच राहू...
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक : 99.78 टक्के विक्रमी मतदान

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक : 99.78 टक्के विक्रमी मतदान

राजकारण
नांदेड| महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (18 जून) शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर एकूण 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 99.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, कंधार, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर या सात मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले, तर भोकर केंद्रावर 97.92 टक्के मतदान नोंदविण्यात आले. नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असून, मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच वेब कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले. निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी ना...
भाजपच्या SIR बूथ मॅपिंग व संघटनात्मक आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपच्या SIR बूथ मॅपिंग व संघटनात्मक आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

राजकारण
सिरंजनी येथे संयुक्त बैठकीत बूथ सक्षमीकरणावर भर; शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हिमायतनगर | सिरंजनी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद सरसम–सिरंजनी गट व दुधड–कामारी गटाची संयुक्त SIR बूथ मॅपिंग व संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख आणि जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ सक्षमीकरण, संघटनात्मक बांधणी तसेच BLA-2 कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत...
हदगाव येथे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

हदगाव येथे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

राजकारण
जनसंपर्क कार्यालयात छोटेखानी बैठकीत संघटनात्मक कामांचा घेतला आढावा हदगाव/नांदेड | हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी आज हदगाव येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची छोटेखानी बैठक घेत विविध विषयांवर चर्चा केली. हदगाव येथील माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत परिसरातील घडामोडी, संघटनात्मक उपक्रम तसेच सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या, अडचणी तसेच सूचना माजी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी सकारात्मक चर्चा करत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्न सोडव...
दत्ता कोंकेवाड यांची अखिल भारतीय सरपंच परिषद नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दत्ता कोंकेवाड यांची अखिल भारतीय सरपंच परिषद नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

राजकारण
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा एकंबा गावचे उपसरपंच दत्ता पुंजाराम कोंकेवाड यांची अखिल भारतीय सरपंच परिषद, नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचे कार्य, लोकसंपर्क कौशल्य आणि ग्रामविकासाबाबतची तळमळ लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय (बापू) जगदाळे यांनी दिनांक ८ जून २०२६ रोजी निवडीचे नियुक्तीपत्र जारी केले. सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक एकात्मता आणि ग्रामपंचायत व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रभावी कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियुक्तीपत्रानुसार, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामविका...
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे संताप; रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंदची मागणी

हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे संताप; रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंदची मागणी

राजकारण
हिमायतनगर| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, रस्ता दुरुस्त न करता टोल वसुली सुरू ठेवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर युवती सेना जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, हिमायतनगर ते सरसम दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवडही करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांत या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असून, सुमारे 10 ते 15 जणांना जीव गमवावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक नागरिक कायमस्वरूपी जखमी किंवा अपंग झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्...
खत टंचाईवरून हिमायतनगरात शेतकऱ्यांचा संताप; कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

खत टंचाईवरून हिमायतनगरात शेतकऱ्यांचा संताप; कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

राजकारण, शेती
स्थानिक शेतकऱ्यांना खत नाकारून बाहेरील लोकांना पुरवठ्याचा आरोप; कृषी विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात खत टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, खत वितरणातील कथित अनियमितते विरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. तालुक्यातील कृषी दुकानदार आणि कृषी विभागाच्या संगनमतातून स्थानिक शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केला आहे. या निषेधार्थ सोमवारी (दि. ८ जून) रोजी हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर वामनराव पाटील वडगावकर यांनी तब्बल तासभर अर्धनग्न आंदोलन करत कृषी विभाग व खत विक्रेत्यांच्या कथित मनमानी कारभाराचा जाब विचारला. या आंदोलनाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणा...
हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल; आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल; आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

राजकारण
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत दिनांक 8 ते 12 जून दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होणार असून, यासाठी महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी दिली आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या देखरेखीखाली संबंधित ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केला जाणार असून, सरपंच, सदस्य, राजकीय कार्यक...
error: Content is protected !!