जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

समर्थकांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी (दि. ३० जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी विलासराव व्यवहारे, बंडू पाटील मिराशे (तालंग), पंजाबराव तांबारे (गारगव्हाण), अशोकराव कदम (मार्लेगाव), गजानन कदम (रुई), सुभाषराव एकलारे (सावरगाव), अवधूत देवसरकर (लिंगापूर), संतोष विनायकराव कदम (बोरगाव), अविनाश शिंदे (कोथळा), सुनील आनेराव (करमोडी), सिताराम किसनराव भुरके (चोरंबा), डिंगाबर धुमाळे (खरबी), तुकाराम नाईक (माळझरा), रमेश घंटलवार (घोगरी), बालाजीराव कदम (वाळकी), संतोष कोल्हे (धानोरा), सतीश रामराव माने (येळंब), श्रीराम पवार (शिवणी), नितीन राठोड (कोंढूर) तसेच आप्पाराव करनुरे (पांगरी) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर समर्थकांनी विजयाच्या घोषणा देत उत्साह व्यक्त केला. हदगाव मतदारसंघातील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून, प्रमुख इच्छुकांच्या उमेदवारीमुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!