जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल

समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मंगळवारी (दि. ३० जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत संचालक मंडळाचे सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यापूर्वी समर्थकांनी एकत्रित शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सहकार क्षेत्रासह राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

“सत्याला काही काळ संघर्ष करावा लागू शकतो, पण पराभव कधीच स्वीकारावा लागत नाही. न्यायावरचा विश्वास कायम ठेवत आम्ही पुढे चाललो आहोत. जनतेचा आणि सहकार क्षेत्रातील सभासदांचा आशीर्वाद हेच आमचे खरे बळ आहे.” – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!