Tag: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; शोभायात्रा

कामारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; भीमगीत, अन्नदान व खीरदानातून मानवतेचा संदेश

कामारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; भीमगीत, अन्नदान व खीरदानातून मानवतेचा संदेश

धर्म अध्यात्म
हिमायतनगर| कामारी (ता. हिमायतनगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दि. २९ एप्रिल रोजी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दि. ३० एप्रिल रोजी भीमगीतांच्या सुरांनी गाव दुमदुमले, तर अन्नदानाच्या माध्यमातून मानवतेचा जिवंत संदेश देण्यात आला. भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ उत्तम नरवाडे, उपाध्यक्ष हर्षवर्धन भगवान शिंगणकर तसेच भीमगर्जना युवा मंचचे अध्यक्ष रोहितदादा नरवाडे व उपाध्यक्ष सुमेधभाऊ नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व भीमसैनिकांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी केला. यानंतर १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त खीरदानाचा उपक्रम राबवून बंधुता, समता आणि करुणेचा संदेश दिला. रखरखत्या उन्हातही महिनाभर अथक परिश्रम घेऊन हे उपक्रम राबवण्यात आले. काही ठिकाणी चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्कार सोहळा उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्कार सोहळा उत्साहात

करियर
लोहा| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत कृतज्ञता गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार विठ्ठल परळीकर होते. यावेळी बोलताना तहसीलदार परळीकर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांमुळेच समाजात समता निर्माण झाली आणि शिक्षणाची क्रांती घडून प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली झाली. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. जिज्ञासा अभ्यासिका ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असून, गेल्या बारा वर्षांत अनेक विद्यार्थी नोकरीला लागले आहेत, ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष करीम शेख, प्रा. डॉ. डी. एम. पवार, माजी नगरसेविका कमलबाई धुतमल, मारुती पाटील बोरगावकर, नगरसेवक हरिभाऊ चव्...
हिमायतनगरात २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

हिमायतनगरात २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

सामाजिक
हिमायतनगर|  हिमायतनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता परमेश्वर मंदिराजवळ, बस स्टँड परिसरात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पहिले सत्र (सायं. ४ वाजता): या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन पाटील (समाज व विचार मंच) राहणार असून उद्घाटन माजी आमदार माधवराव कदम कोळीकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे उपस्थित राहणार आहेत. दुसरे सत्र (सायं. ६.३० वाजता): या सत्राचे अध्यक्ष मधुसूदन क...
हिमायतनगर शहरासह कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

हिमायतनगर शहरासह कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

धर्म अध्यात्म
हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, विविध संस्था, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालये तसेच बौद्ध विहारांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष शेख रफिकभाई व नगरसेवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी नारवटकर, पांचाळ, स्वप्निल भद्रे, भौरे, भिसे आदींनी अभिवादन केले. तसेच तहसील कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांतही जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील तक्षशिला बौद्ध विहारातही जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम...
समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सामाजिक
प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण जीवनात करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड| नांदेड येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देत बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण प्रत्यक्ष जीवनात करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सामाजिक समता सप...
हिमायतनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; शोभायात्रा, भीमगीतांतून अभिवादन

हिमायतनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; शोभायात्रा, भीमगीतांतून अभिवादन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासह तालुकाभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढत अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध चौकांमध्ये मान्यवरांनी भीमसैनिकांना शुभेच्छा देत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. महिला-पुरुष, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिमायतनगर शहरात सकाळी ११ वाजता पंचशील ध्वजारोहणानंतर नालंदा बौद्ध विहारात सामुदायिक पंचशील व त्रिशरण ग्रहण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांवरून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेदरम्यान शालेय विद्यार्थी व युवकांनी...
error: Content is protected !!