सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

ज्येष्ठ नागरिक कै. राधाकिशनजी दाड यांचे निधन; आज सायंकाळी अंतिम यात्रा

ज्येष्ठ नागरिक कै. राधाकिशनजी दाड यांचे निधन; आज सायंकाळी अंतिम यात्रा

सामाजिक
नांदेड, प्रतिनिधी | नांदेड येथील ज्येष्ठ नागरिक कै. राधाकिशनजी द्वारकादासजी दाड (वय 87) यांचे आज बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सकाळी 10.12 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दाड परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कै. राधाकिशनजी दाड हे गोपिकिशनजी दाड यांचे ज्येष्ठ बंधू होते. तसेच डॉ. पुरुषोत्तम दाड, अशोक दाड, प्रा. कैलास दाड व विनोद दाड यांचे वडील होते. राजगोपाल दाड, रामदेव दाड, रामेश्वर दाड व गोपाल तोतला यांचे मोठे वडील म्हणूनही त्यांची ओळख होती. तसेच अमितज दाड, शुभम दाड, डॉ. गणेश दाड, केदार दाड व डॉ. यश दाड यांचे ते आजोबा होते. त्यांची अंतिम यात्रा आज सायंकाळी 5 वाजता गोकुळ नगर येथील ‘द्वारका निवास’ या राहत्या घरातून निघणार असून, गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. कै. राधाकिशनजी दाड यांच्या निधनाने दाड परिवारावर शोककळा पसरली असून, नातेवाईक व मि...
पंचायत समितीचे अधिकारी व्यंकटेश ऊर्फ बाळु दमकोंडवार यांचे दुःखद निधन : सोमवारी अंत्यसंस्कार

पंचायत समितीचे अधिकारी व्यंकटेश ऊर्फ बाळु दमकोंडवार यांचे दुःखद निधन : सोमवारी अंत्यसंस्कार

सामाजिक
हिमायतनगर| येथील पंचायत समितीचे वरीष्ठ सहाय्यक व्यंकटेश ऊर्फ बाळु अशोकराव दमकोंडवार (वय 50 वर्ष) यांचे दि. 7 रविवारी सायंकाळी 4:30 वाजता उपचारा दरम्यान नांदेडच्या खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाल. त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर दि. 8 सोमवारी सकाळी 11;00 वाजता हिमायतनगर - बोरगडी रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते प्रसिध्द व्यापारी रविंद्र दमकोंडवार यांचे चुलत बंधु, सुनिल दमकोंडवार यांचे मोठे बंधु, कै. अशोक दमकोंडवार सर यांचे मोठे चिरंजीव होत. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांचे मुळ गाव सरसम सह हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली आहे, तालुक्यात त्यांचा चाहता वर्ग मोठा असुन ते  सर्वांशी आपुलकीने वागत होते....
वृद्धापकाळाने मुक्ताबाई हरी वाठोरे यांचे निधन

वृद्धापकाळाने मुक्ताबाई हरी वाठोरे यांचे निधन

सामाजिक
हदगाव | तालुक्यातील हरडफ येथील रहिवासी तथा सध्या अंबा नगर, सांगवी (नांदेड) येथे वास्तव्यास असलेल्या मुक्ताबाई हरी वाठोरे (वय ८५) यांचे आज रविवार, दि. ७ जून रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज रविवार, दि. ७ जून रोजी दुपारी ३ वाजता अंबा नगर, सांगवी (नांदेड) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या राहुल वाठोरे व शंकर वाठोरे यांच्या मातोश्री होत. मुक्ताबाई वाठोरे यांनी आपले आयुष्य धम्ममय पद्धतीने व्यतीत केले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक, मित्रपरिवार व समाजबांधवांकडून शोक व्यक्त केला जात आहे. यावेळी गौतम वाठोरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “राहुल वाठोरे यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मुक्ताबाई यांच्या सहवास...
हिमायतनगर येथील चम्पालालजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण

हिमायतनगर येथील चम्पालालजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक व श्रीश्रीमाल परिवारातील आदरणीय व्यक्तिमत्त्व श्रीमान सुश्रावक चम्पालालजी मिश्रीमलजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण झाल्याची दुःखद वार्ता समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कारासाठी चलावा (अंतिम यात्रा) सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या गणेश मंदिर परिसरातील निज निवासस्थान, हिमायतनगर येथून निघणार असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली आहे. दिवंगत आत्म्यास शांती लाभो व मोक्षमार्गाची उत्तम गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. ते वर्धमान मेन्स वेयर चे संचालक आशिष जैन, सुमित जैन यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात तख्तमल, महावीरचंद, शांतिलाल, अमरचंद, राजवर्धन, त्रिलोकचंद, आशीष, सुमित, समकित तसेच समस्त श्रीश्रीमाल परिवार असा मोठा परिवार आह...
ज्येष्ठ नागरिक शंकरराव रामजी पंदलवाड यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

ज्येष्ठ नागरिक शंकरराव रामजी पंदलवाड यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील धानोरा (ज.) येथील ज्येष्ठ नागरिक शंकरराव रामजी पंदलवाड (वय १००) यांचे दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते दैनिक गोदातीरचे पत्रकार तथा ॲड. ज्ञानेश्वर पंदलवाड यांचे वडील होत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पंदलवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या शांत, साध्या व प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे. स्व. शंकरराव रामजी पंदलवाड यांच्यावर सोमवार दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता धानोरा (ज.) ता. हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ALM Bharat टीमच्या वतीनेभावपूर्ण श्रद्धांजली…! 🕯️🙏...
कै. कलावतीबाई रामजी आडबलवाड यांचे वृद्धापकाळाने निधन आज सायंकाळी सरसम येथील शेतात अंत्यसंस्कार

कै. कलावतीबाई रामजी आडबलवाड यांचे वृद्धापकाळाने निधन आज सायंकाळी सरसम येथील शेतात अंत्यसंस्कार

सामाजिक
हिमायतनगर| सरसम येथील रहिवासी कै. कलावतीबाई रामजी आडबलवाड (वय ८५) यांचे शनिवारी दि. ३० रोजी सकाळी ८:१५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज दि. ३० शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता सरसम येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या शासकीय आश्रम शाळा दुधड, ता. हिमायतनगर येथील शिक्षक तुकारामजी आडबलवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता आडबलवाड तसेच नंदु आडबलवाड यांच्या मातोश्री होत. कै. कलावतीबाई रामजी आडबलवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏...
पाणीटंचाईवर ‘श्रमदानाचा’ उपाय; नगराध्यक्ष स्वतः उतरले बंधाऱ्यात

पाणीटंचाईवर ‘श्रमदानाचा’ उपाय; नगराध्यक्ष स्वतः उतरले बंधाऱ्यात

सामाजिक
मंगरूळ बंधाऱ्यातील अडथळा दूर करून विहिरीपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न; शहराच्या नळयोजनेला मिळणार गती हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| उष्णतेचा पारा 42 अंश डिग्री सेल्सिअस वर असताना तळपत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या हिमायतनगर शहरवासीयांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, शहराच्या पाणीप्रश्नावर तात्पुरता का होईना मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले असून, तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगरूळ बंधाऱ्यातून विहिरीकडे जाणाऱ्या पाण्याचा अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः श्रमदान करत पुढाकार घेतला आहे. विदर्भ–मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवरील मंगरूळ बंधाऱ्यातून हिमायतनगर शहरासाठी सुमारे 19. 39 कोटी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा नळयोजना उभारण्यात आली आहे. या योजनेचे बहुतांश काम पूर्णत्वास आल...
हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता हेंद्रे (ढेकळे) यांचे गुरुवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात व समाजबांधवांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दत्ता हेंद्रे यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने माळी समाजासह हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, नातू, पंतू असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 29 मे रोजी दुपारी 12 वाजता हिंदू स्मशान भूमी, लाकडोबा चौक, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
हिमायतनगर येथील ज्येष्ठ कृषी व्यापारी रामराव पाटील सुर्यवंशी यांच्या पत्नीचे दुःखद निधन

हिमायतनगर येथील ज्येष्ठ कृषी व्यापारी रामराव पाटील सुर्यवंशी यांच्या पत्नीचे दुःखद निधन

सामाजिक
हिमायतनगर| हिमायतनगर येथील ज्येष्ठ कृषी व्यापारी रामराव पाटील सुर्यवंशी यांच्या धर्मपत्नी स्व. विमलबाई रामराव सुर्यवंशी यांचे गुरुवार दि. 28 मे रोजी रात्री 9 वाजता आदिलाबाद येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पती रामराव पाटील सुर्यवंशी, तीन मुलं, एक मुलगी, दोन सुना, नातू असा मोठा परिवार आहे. स्व. विमलबाई सुर्यवंशी यांच्यावर आज दि. 29 मे 2026 रोजी दुपारी 12.10 वाजता हिंदू शमशान भूमी, लकडोबा चौक, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुर्यवंशी परिवारावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
जुन्या लोहा शहरात जाणारा रस्ता होणार प्रशस्त; वर्षानुवर्षांची समस्या मार्गी, सहा मालमत्ताधारकांनी दिली जागा

जुन्या लोहा शहरात जाणारा रस्ता होणार प्रशस्त; वर्षानुवर्षांची समस्या मार्गी, सहा मालमत्ताधारकांनी दिली जागा

सामाजिक
लोहा | लोहा शहरातील जुन्या भागात जाणाऱ्या अरुंद रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडले असून, मस्जिद परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. ग्रामपंचायत काळात तसेच नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतरही वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रश्न आता नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या टीमच्या पुढाकारामुळे सुटताना दिसत आहे. जुन्या शहरात जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण, नाल्यांपुढे वाढवलेल्या पायऱ्या आणि मनमानी बांधकामांमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. मात्र नगर परिषद प्रशासनाने धाडसी भूमिका घेत या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करत काही नागरिकांनी स्वखुशीने स्वतःच्या मालकीची जागा रस्त्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भात नगराध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्...
error: Content is protected !!