धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील कमलाई नगर परिसरात ३ एप्रिल रोजी संकटमोचन हनुमान मंदिरातील कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमय प्रसंगी परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात पार पडलेल्या धार्मिक विधी, पूजन आणि कलशारोहण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत संकटमोचन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला परमपूज्य महंत गोपाळगीर गुरुरायगिर महाराज (दत्तबर्डी संस्थान), शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव संस्थान), योगिराज बापू गुरु दत्ताबापू (श्रीकृष्ण मंदिर), आमदार बाबुराव कदम कोहळीकर, नगराध्यक्ष रोहिणीताई वानखेडे, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गटनेते गोपाल भाऊ सारडा, शहरप्रमुख बबन...
हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा

हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा

धर्म अध्यात्म
हनुमान जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वैभवाचे दर्शन घडवणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या पवित्र निमित्ताने बिलोली शहरात दरवर्षी आयोजित केली जाणारी कुस्त्यांची स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, ती शौर्य, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. बिलोलीतील कुस्त्यांची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी असून, या परंपरेने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मातीच्या आखाड्यात घडणारी ही कुस्ती केवळ शरीराची ताकद दाखवणारी नसून, ती मानसिक स्थैर्य, शिस्त आणि संस्कारांची जोपासना करणारी आहे. गावोगावी आणि जिल्ह्याजिल्ह्यातून येणारे कुस्तीपटू आपल्या कलेचा कस लावण्यासाठी येथे एकत्र येतात आणि त्यामुळे हा सोहळा एक भव्य क्रीडामहोत्सव ठरतो. या परंपरेचा वारसा जपण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते....
तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| विदर्भ-मराठवाडा -तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर तालुक्याच्या बोरगडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन पर्वानिमित्त आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बोरगडी येथील हनुमान मंदिरात उपस्थित होऊन मारोतीरायाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे परमभक्त आणि शक्ती-युक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मतदार संघातील सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.   यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. मंदिर कमेटीच्या वतीने आमदारांचा स्वागत व सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महत्त्वप...
हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार | चैत्र शुद्ध नवमी, दि. ०२ एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या हनुमान जयंती निमित्त विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक व मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. “जय हनुमान... जय श्रीराम... बजरंगबली की जय...” अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडून श्रींचे दर्शन घेतले. नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे ३० हजारांहून अधिक भाविकांनी दिवसभरात दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त केली. अनेक भक्त हिमायतनगरहून तळपत्या उन्हात पायी चालत येऊन नवस फेडताना दिसून आले. प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी पूजा-अभिषेक केल्यास भय दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यानिमित्ताने रुचकीची पाने, फुलांच्या माळा, फेटे अ...
जातविरहित पद्धतीने डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होणार

जातविरहित पद्धतीने डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होणार

धर्म अध्यात्म
नांदेड | राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा नांदेडमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने, जातविरहित आणि पारंपारिक स्वरूपात जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव पूर्णपणे डिजेमुक्त, बॅनरमुक्त आणि वर्गणीमुक्त असणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांची, तर सचिवपदी उद्योजक बालाजी इबितदार यांची निवड करण्यात आली आहे. फुले-शाहू-आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, १४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा प्रारंभ राज कॉर्नर येथून होणार असून, विविध समाजघटकांतील मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. या मिरवणुकीत मशाल रॅली, हलगी पथक, मुल...
श्रीक्षेत्र गंगणबीड येथे पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रा उत्साहात

श्रीक्षेत्र गंगणबीड येथे पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रा उत्साहात

धर्म अध्यात्म
नायगाव| तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड येथे आंबली-बारसी निमित्त पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २९ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली. प्राचीन व जाज्वल्य परंपरा लाभलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड देवस्थानावर शिखर शिंगणापूरनंतर भाविकांची मोठी श्रद्धा असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते. कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे : रविवार दि. २९ मार्च : सायंकाळी ५ वाजता देवस्थानचे मुख्य पुजारी भागवत अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी शिव-पार्वतीची विधिवत महाभिषेक व आरती होईल. त्यानंतर बँड-बाजा, हलगी-सनई व भजनी मंडळींच्या गजरात पालखी गावातील मुख्य मार्गाने सायंकाळी ८ वाजता हनुमान मंदिरात पोहोचेल. तेथेही मह...
खडकी बा. येथील जागृत रोकडोबा मारोती मंदिर, परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम

खडकी बा. येथील जागृत रोकडोबा मारोती मंदिर, परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम

धर्म अध्यात्म
हिमायतनगर (अनिल मादसवार ) तालुक्यातील मौजे खडकी (बा.) येथील जागृत देवस्थान रोकडोबा मारोती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. बाल अवतारातील दक्षिणमुखी हनुमानाची ही मूर्ती पुरातन काळापासून येथे विराजमान असून, तिच्याशी निगडित एक विशेष आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे. माहितीनुसार, ही मूर्ती बैलगाडीतून सिरंजणी येथे नेण्यात येत असताना खडकी येथे मुक्कामासाठी थांबलेला ताफा दुसऱ्या दिवशी पुढे निघाला, मात्र मूर्ती असलेली बैलगाडी हललीच नाही. यानंतर खडकी व सिरंजणी गावातील नागरिकांनी ही दैवी इच्छा मानून येथेच मूर्तीची स्थापना केली. त्या दिवसापासून या मंदिराला “रोकडोबा मारोती” म्हणून ओळख मिळाली. दरवर्षी आमली बारशीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भगवा ध्वज फडकवून व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने पूजा केली जाते. गुढीपाडव्यापासून आमली बारशीपर्यंत श...
वाळकी येथे जागृत देवस्थान माता इसाई देवी यात्रेला प्रारंभ; अखंड हरिनाम सप्ताह सुरु

वाळकी येथे जागृत देवस्थान माता इसाई देवी यात्रेला प्रारंभ; अखंड हरिनाम सप्ताह सुरु

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम हनवते | हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथील जागृत देवस्थान माता इसाई देवीच्या दहा दिवसांच्या यात्रेला 31 मार्चपासून प्रारंभ झाला असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहालाही उत्साहात सुरुवात झाली आहे. माता इसाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशातून दरवर्षी हजारो भाविक येथे येत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती पुजारी विठ्ठल धर्माजी गायकवाड यांनी दिली. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या छबिन्याचा सोहळा 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मध्यरात्री पार पडणार आहे. या वेळी मंदिराला प्रदक्षिणा घालत “जय देवी”च्या जयघोषात हजारो भाविक सहभागी होतात. माता इसाई देवीचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून, मुख्य प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आहे. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर दीपमाळीत तेल...
हरदडा येथे उद्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

हरदडा येथे उद्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव तालुक्यातील मौजे हरदडा येथे उद्या (दि. ३० मार्च) अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य आयोजिका प्रणिताताई कांबळे यांनी केले आहे. प्रणिताताई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित या परिषदेचा उद्देश बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी विचारांचे प्रबोधन हा आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील ध्वजारोहणाने होणार असून, उपासिका सुजाताबाई अशोक दवणे, शांताबाई शंकर कांबळे व छायाबाई विजयराव कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता दुसऱ्या सत्रास प्रारंभ होईल. या सत्रात भिक्खू संघाची धम्मदेशना भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, आंबेडकरवादी मिशन, नांदेडचे संचालक दीपक कदम यांचेही मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या ...
हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे उद्या नववी बौद्ध धम्म परिषद

हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे उद्या नववी बौद्ध धम्म परिषद

धर्म अध्यात्म
नांदेड/हिमायतनगर| तालुक्यातील सोनारीफाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने रविवारी (दि. २९ मार्च) एकदिवसीय नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत धम्मदेसना, मान्यवरांचा गौरव, व्याख्याने तसेच ख्यातनाम शाहिरांच्या समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहारदार मेळा रंगणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिषदेची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजारोहणाने होणार असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर पुज्यनिय भन्ते पय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी प्रा. डॉ. जे. टी. जाधव व प्रा. डॉ. विजय गोणारकर यांची विचारप्रवर्तक व्याख्याने होणार आहेत. दुपारी २ वाजल्यापासून बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून भिमशाहीर माध...
error: Content is protected !!