राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व शादीखाना प्रश्न मार्गी लागणार

लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व शादीखाना प्रश्न मार्गी लागणार

राजकारण
लोहा/नांदेड | लोहा शहरातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच मुस्लिम बांधवांच्या शादीखान्याच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीनंतर आमदार चिखलीकर यांनी लवकरच जागेचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी (आयएएस), निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपनगराध्यक्ष करीम शेख, मन्नान चौधरी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ...
आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

राजकारण
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामागे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील नदीपात्रात पाणी सोडण्याची म्हणी लावून धरली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आह...
खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड पालिकेच्या विकासकामांचा शुभारंभ

खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड पालिकेच्या विकासकामांचा शुभारंभ

राजकारण
नांदेड | नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण सोमवारी पार पडले. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार Ashok Chavan यांच्या हस्ते या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची ही पहिली वचनपूर्ती मानली जात आहे. या अंतर्गत कौठा परिसरात २४x७ पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नवीन वाहनांचा ताफा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी तब्बल ७४ ऑनलाईन सेवांचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार चव्हाण म्हणाले, “नांदेडला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि डिजिटल सेवा या त्रिसूत्रीवर भर दिला जात आहे.” या विकासकाम...
लोह्यात भव्य शेतकरी मेळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

लोह्यात भव्य शेतकरी मेळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

राजकारण
नांदेड/लोहा | नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकरी व महिला कल्याणाच्या विविध योजनांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडत मोठ्या घोषणा केल्या. या मेळाव्याला जिल्ह्यासह आसपासच्या भागातून शेतकरी, महिला व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आमदार व ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. या वेळी त्यांचा “महाराष्ट्राचे शेतकरी नेते” असा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. विशेषतः “लाडकी बहिण” योजनेचा उल्लेख करत ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे त्यांनी ठ...
नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 31 मार्चला आढावा बैठक

नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 31 मार्चला आढावा बैठक

राजकारण
नांदेड | नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंगळवार, दि. 31 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता बायपास रोडवरील आनंदसागर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी दिली आहे. या बैठकीला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन होणार असून, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगांवकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व माजी आमदार, पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदेमधील निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महिला, युवक, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, ओबीसी, किसान, कामगार, दिव्यांग, शिक्षक, इंजि...
भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

आरोग्य, राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील बरडशेवाळा येथे हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ व ‘पोले इंडोव्हॅस्क्युलर केअर, संभाजीनगर’चे संचालक डॉ. शिवाजीराव पोले यांनी आपल्या जन्मभूमीत हे शिबिर आयोजित केले. हभप मधुकर खोडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त हभप रामेश्वर खोडे महाराज (ईसापुरकर) यांच्या वाणीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान रविवारी (दि. 29 मार्च) या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश मस्के, दंतरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी मस्के यांच्यासह नांदेड येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. त्यामध्ये डॉ. बालाजी नाईक (मधुमेह, थायरॉईड व हार्मोन तज्ज्ञ), डॉ. सूरज जाधव (न्यूरो सर्जन), डॉ. विठ्ठल फड (जनरल फिजिशियन), डॉ. उमेश कानडे (...
पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर

पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर

राजकारण
नांदेड| राजकारणात बदल हा शाश्वत असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तब्बल पाच विधानसभा निवडणुकांत शिवसेनेविरुद्ध लढत देणारे ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. २९ मार्च रोजी लोहा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत. नव्वदच्या दशकात “भीक नको, हवे घामाचे दाम” या घोषणेने राज्यभर आंदोलने उभारणारे शंकरअण्णा धोंडगे हे शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या विचारातून घडलेले नेते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघर्ष करत अनेकदा जेलही भोगली. प्रभावी वक्तृत्व आणि शेतकऱ्यांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी मोठा कार्यकर्ता वर्ग तयार केला. १९९५ पासून कंधार विधानसभा मतदारसंघात त्यांनी अपक्ष आणि नंतर विविध पक्षांतून निवडणुका लढवत शिवसेनेशी थेट मुकाबला केला. त्या क...
error: Content is protected !!