हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यनिष्ठा, जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण कामामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला आजही अभेद्य राहिला आहे, असा ठाम विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी व्यक्त केला.


तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित ‘सृजन संघटन अभियान’ बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पक्ष निरीक्षक मोहमद अरीफखान, जिल्हा उपाध्यक्ष नागराज सुलगेकर, उपाध्यक्ष तातेराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


बैठकीच्या प्रारंभी माहूरगड दत्त संस्थानचे महंत मधूसुदनजी भारती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पावडे यांचा सत्कार करण्यात आला. पावडे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत संघटनात्मक बळकटीसाठी विशेष प्रयत्न सुरू असून पक्षश्रेष्ठी याचा सखोल आढावा घेणार आहेत. माजी आमदार जवळगावकर यांनी शहरासह ग्रामीण भागात निर्माण केलेल्या विश्वासाच्या भक्कम पायावर काँग्रेसने नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे.


आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून एकजुटीने काम करावे, असे आवाहन करत काँग्रेसचा झेंडा पुन्हा दिमाखात फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, संचालक गणेश शिंदे, संजय माने, सुभाष शिंदे, डॉ. अब्दुल गफ्फार, बाळा पाटील, नगरसेवक अब्दुल कलीम,फेरोज खान, इलियास भाई, शेख रहिम भाई, मायंबा होळकर,नितेश जैस्वाल,पापा पार्डीकर, खालिद भाई, कानबा पोपलवार, सोपान बोंपीलवार, प्रविण जाधव, संतोष आंबेकर, हानिफ भाई,मन्नानभाई, अंकुश मोरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




