BSNL नेटवर्कसाठी दिल्लीत पाठपुरावा; ग्रामीण भागाला दिलासा मिळणार?

नांदेड/हिंगोली, अनिल मादसवार| हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या दूरसंचार सेवांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया (Jyotiraditya Scindia) यांची भेट घेतली.

या चर्चेत ग्रामीण भागातील BSNL नेटवर्कची अत्यंत दयनीय अवस्था मांडत, तात्काळ सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः नवीन मोबाईल टॉवर्स उभारणी, सिग्नलची गुणवत्ता वाढवणे आणि ग्राहकसंख्या वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

सध्या अनेक गावांमध्ये कॉल ड्रॉप, इंटरनेट बंद पडणे आणि सिग्नल नसणे अशा समस्या कायम आहेत. यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीनंतर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागाला सक्षम दूरसंचार सुविधा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!