हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात ‘वाचन संस्कृती जोपासणे’वर वक्तृत्व स्पर्धा
सुदेशना पिंचा प्रथम; रुक्मा गायकवाड द्वितीय तर नंदिनी भगत तृतीय
हिमायतनगर, प्रतिनिधी| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन संस्कृती जोपासणे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन संस्कृतीचे महत्त्व विविध पैलूंतून मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजू बोंबले यांनी केले.
प्रास्ताविकातून ग्रंथपाल राजू बोंबले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत वाचन संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी डिजिटल युगात वाचनाची गरज अधो...




