विष्णुपुरी उड्डाणपूल घटनेची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कठोर कारवाई होणार – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड| नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग कोसळल्याच्या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
घटनेनंतर पालकमंत्री सावे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उड्डाणपुलाच्या संरचनात्मक स्थिरतेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच या घटनेच्या तांत्रिक चौकशीसाठी केंद्रीय तज्ज्ञांची टीम दिल्लीहून नांदेडला दाखल होणार असल्याची ...





