नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी एक लाखांची मदत द्या
संभाजी ब्रिगेडचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नांदेड| नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना देण्यात आले.
संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, नांदेड जिल्ह्यात गतवर्षी आजपर्यंत ८२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र केवळ ५२१ मिलिमीटर पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३०५ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. पावसाच्या या तुटीचा थेट परिणाम खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह...







