ऑपरेशन क्रॅकडाऊनचा करारा दणका; हिमायतनगरात 11 लाखांचा गुटखा जप्त!
हजरत चौकात पोलिसांचा सापळा यशस्वी; दोन गुटखा तस्कर जेरबंद
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिमेचा जोरदार धडाका हिमायतनगरात पाहायला मिळाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या थरारक कारवाईत 11 लाख 15 हजार 640 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित जर्दा आणि तंबाखूचा साठा जप्त करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या पथकाने हजरत चौक, बेस्ट कॉलनी परिसरात सापळा रचला. संशयित स्विफ्ट डिझायर (MH 48 F 0708) कारची झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पानमसाला आढळून आला.
यावेळी शेरखॉन मुसाखान पठाण (वय 32) व शाहरूखखान मुसाखान पठाण (वय 28) संभाजीनगर तामसा तालुका हदगांव या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपींनी सदरचा गुटखा, ...





