आरोग्य

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य, महाराष्ट्र
मुंबई| जपानी मेंदूज्वरासारख्या धोकादायक संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करत या आजारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत लसीकरण मोहीम सुरू असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या उपाययोजनांमुळे सध्या रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे. आजाराचे स्वरूप आणि धोका जपानी मेंदूज्वर हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून तो मेंदूवर परिणाम करतो. यात झटके येणे, न्यू...
सामाजिक समता सप्ताहात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न

सामाजिक समता सप्ताहात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न

आरोग्य
नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत आज (दि. 13 एप्रिल) संध्या छाया संचलित रुस्तुमजी मेवालाल वृद्धाश्रम, मालेगाव रोड, नांदेड येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे उपस्थित होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे विठ्ठल बोराटे, कपिल जेटलावार, गजानन पंपटवार, विजय माळवतकर, प्रमोद गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा संविधानाच्या प्रस्तावनेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आयोजित आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया गोडघासे, त्वचारो...
हदगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय दुहेरी सन्मान

हदगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय दुहेरी सन्मान

आरोग्य, स्थानिक
नांदेड,अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ आणि ‘महा आरोग्य सन्मान 2026’ या दोन्ही पुरस्कारांमध्ये उपजिल्हा रुग्णालय, हदगाव (50 बेड) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दुहेरी यशामुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या उत्कृष्ट कार्यपद्धती, दर्जेदार आरोग्य सेवा आणि रुग्णाभिमुख उपक्रमांच्या बळावर हा सन्मान मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी तसेच इतर सर्व कर्मचारीवर्गाचे हदगांव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांतील सेवा गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना अध...
नांदेडमध्ये आरोग्य प्रशासनात खळबळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

नांदेडमध्ये आरोग्य प्रशासनात खळबळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

आरोग्य
नांदेड| जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने शासनाने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रशासकीय शिस्तभंग, कार्यातील हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन न केल्याचे मुद्दे समोर आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा धोक्यात येत असल्याची नोंद वरिष्ठ पातळीवर करण्यात आली होती. निलंबन कालावधीत डॉ. संगीता देशमुख यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना केवळ नियमानुसार भत्ता देण्यात येणार आहे. तसेच या काला...
भोकर ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

भोकर ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

आरोग्य
भोकर (प्रतिनिधी) गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या मोहिमेत १४ ते १५ वयोगटातील मुलींना लस देण्यावर भर दिला जात आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या नियोजनानुसार ६ एप्रिल रोजी दोन मुलींना एचपीव्ही लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पालकांना एचपीव्ही लसीबाबत सविस्तर माहिती देण्यात येत असू...
20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

आरोग्य
नांदेड (गोविंद मुंडकर) दि. 20 मार्च ते 20 एप्रिल 2026 हा कालावधी ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’ म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे.नागरिकांमध्ये दंत व मौखिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, नागरिक आणि विशेषतः वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, बालगृहे आणि ग्रामीण भागात मोफत तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि आरोग्य मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 02 एप्रिल 2026 रोजी नांदेड येथील सुमन बालगृहात मौखिक आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नि. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम बुट्टे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राष्ट्रपाल औसारे तसेच दं...
भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

आरोग्य, राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील बरडशेवाळा येथे हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ व ‘पोले इंडोव्हॅस्क्युलर केअर, संभाजीनगर’चे संचालक डॉ. शिवाजीराव पोले यांनी आपल्या जन्मभूमीत हे शिबिर आयोजित केले. हभप मधुकर खोडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त हभप रामेश्वर खोडे महाराज (ईसापुरकर) यांच्या वाणीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान रविवारी (दि. 29 मार्च) या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश मस्के, दंतरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी मस्के यांच्यासह नांदेड येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. त्यामध्ये डॉ. बालाजी नाईक (मधुमेह, थायरॉईड व हार्मोन तज्ज्ञ), डॉ. सूरज जाधव (न्यूरो सर्जन), डॉ. विठ्ठल फड (जनरल फिजिशियन), डॉ. उमेश कानडे (...
error: Content is protected !!