Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeआरोग्यहदगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय दुहेरी सन्मान

हदगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय दुहेरी सन्मान

‘आरोग्य रत्न’ व ‘महा आरोग्य सन्मान 2026’ प्रथम क्रमांक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातर्फे अभिनंदन

नांदेड,अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ आणि ‘महा आरोग्य सन्मान 2026’ या दोन्ही पुरस्कारांमध्ये उपजिल्हा रुग्णालय, हदगाव (50 बेड) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दुहेरी यशामुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयाच्या उत्कृष्ट कार्यपद्धती, दर्जेदार आरोग्य सेवा आणि रुग्णाभिमुख उपक्रमांच्या बळावर हा सन्मान मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी तसेच इतर सर्व कर्मचारीवर्गाचे हदगांव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांतील सेवा गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक सुधारणा यावर चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून भविष्यातील विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला विवेक देशमुख, डॉ. दरबतरवार, डॉ. स्वामी, भास्कर वानखेडे, राजेश तावडे, तसेच नगरसेवक नामदेव वाकोडे, पांडुरंग जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशामुळे भविष्यात रुग्णालयाच्या सेवा अधिक सक्षम व परिणामकारक होण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!