क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगरच्या उमर चौकात रक्तरंजित हाणामारी

हिमायतनगरच्या उमर चौकात रक्तरंजित हाणामारी

क्राइम
हिमायतनगर| शहरातील उमर चौक परिसरात बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या भीषण भांडणाने परिसरात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्गालगत घडलेल्या या घटनेत तलवार व चाकूचा वापर करून एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. या रक्तरंजित हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दोन्ही बाजूकडील व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल होऊन एकमेकांविरुद्ध तक्रारी देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचेच हे गंभीर रूप असल्याची चर्च...
नांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल

नांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुणांकडून धारदार शस्त्रांचे प्रदर्शन, गुंडगिरीचे व्हिडिओ व भितीदायक पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलाने कडक पावले उचलली आहेत. अशा आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, काही युवक सोशल मीडियावर तलवार, चाकू, कोयते, अग्नीशस्त्रे यांचे प्रदर्शन करत फोटो-व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तसेच चित्रपटातील गुंडगिरीचे गाणे वापरून रील्स तयार करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. काही प्रकरणांमध्ये मृत गुन्हेगारांचे गौरव करणारे व्हिडिओही प्रसारित होत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 मध्ये ...
भोकर पोलिसांची गुटखा माफियावर मोठी कारवाई; ₹1,07,550 चा मुद्देमाल जप्त

भोकर पोलिसांची गुटखा माफियावर मोठी कारवाई; ₹1,07,550 चा मुद्देमाल जप्त

क्राइम
भोकर/ नांदेड| अवैध गुटखा विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹1,07,550 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता बटाळा चौक ते म्हैसा बायपास रोड परिसरात, डॉक्टर एकाळे यांच्या शेताजवळ काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी आमेर खान मुझफर खान (वय ३१, रा. खुदवाईनगर, देगलूर नाका, नांदेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिरोजा पान मसाला (२६० पाकिटे – ₹३१,२००), AAA गुटखा (१६५ पाकिटे – ₹३१,३५०) तसेच स्प्लेंडर मोटारसायकल (MH26-BB-8320 – ₹४५,०००) असा एकूण ₹१,०७,५५० किमतीचा मुद्देमाल ज...
इंस्टाग्रामवर खंजर दाखवून दहशत माजवणाऱ्यांना अटक; 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

इंस्टाग्रामवर खंजर दाखवून दहशत माजवणाऱ्यांना अटक; 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | सोशल मीडियावर खंजरासह फोटो पोस्ट करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ₹50,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार सोशल मीडियावर अवैध हत्यारांचे प्रदर्शन करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामवर खंजरासह फोटो पोस्ट करून “302” असा मजकूर टाकत दहशत निर्माण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी नवीन कोठा, नांदेड परिसरातील दोघांना पोलिसांनी एक खंजर, दोन मोबाईल फोन, स्प्लेंडर मोटारसायकल, एकूण किंमत : ₹50,500 मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपीकडील मोटारसायकल ही चोरीची असल्याचे समोर आले. यासंदर्भात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आधीच गु.र.नं. 286/2026 (कलम 303(2) भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हा दाखल ह...
सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा

सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा

क्राइम
नांदेड | नांदेड ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो टाकून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल 15 गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार सोशल मीडिया अकाउंट्सचे निरीक्षण करण्यात येत होते. तपासादरम्यान काही व्यक्तींनी इंस्टाग्रामवर खंजर, तलवार, गावठी कट्टा यांसह फोटो पोस्ट करून ते व्हायरल केल्याचे आढळले. तसेच काही आरोपींनी आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट केल्याचेही समोर आले. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 333, 335, 340/2026 (कलम 3/25 शस्त्र अधिनियम) गु.र.नं. 334 ते 348/2026 (कलम 4/25 शस्त्र अधिनियम) अशा एकूण 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण 15 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून काही आरोपी अद्याप अनोळखी आहेत. पोलीस निरीक्षक ओ...
एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

क्राइम
धर्माबाद/निझामाबाद | क्रिकेट सट्टा प्रकरणात मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला अखेर धर्माबाद व निझामाबाद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरण निझामाबाद येथील 5th Town पोलीस ठाण्यात गु.र.नं. 66/2025 अंतर्गत दाखल असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 61(2), 316(2), 111 तसेच आयटी अॅक्ट 66-D, 69(A) व सह ३, ४ तेलंगणा जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ दरम्यान क्रिकेट सट्टा चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याचवेळी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर (पो.स्टे. धर्माबाद) यांना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी मनोज मानधनी हा धर्माबाद येथे आला आहे. त्यानुसार निझामाबादच्या North Rural CI यांच्या पथकासोबत संयुक्त सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला अ...
श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

क्राइम
नांदेड | नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या सहा तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. यावेळी मुख्य आरोपीवर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करत त्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे 5.20 वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर यांचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तात्काळ चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. मुख्य आरोपीवर गोळीबार मुख्य आरोपी अंकुश गजानन गंदनवाड (वय 20) हा झरी खदान परिसरात...
ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

क्राइम
नांदेड| शहरातील चोरी व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 ते 7 एप्रिल पहाटे 2 वाजेपर्यंत हे ऑपरेशन पार पडले. या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. नांदेड ग्रामीण , इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ यांसह कुंटूर, रामतीर्थ, सोनखेड, उस्माननगर, लिंबगाव आदी ठाण्यांनी संयुक्त कारवाई केली. ऑपरेशनदरम्यान सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपी, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अनेक संशयितांची चौकशी करून काह...
नांदेडची शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा – रविकांत गायकवाड

नांदेडची शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा – रविकांत गायकवाड

क्राइम
नांदेड| जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत गायकवाड यांनी गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, गेल्या तीन दिवसांत नांदेड शहरात पाच खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड शहरातील ई-स्क्वेअर परिसरातील तिहेरी खून, विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात झालेला खून, तसेच मुरमुरा मार्केट आणि श्रीनगर भागातील सलग घटना या अत्यंत धक्कादायक असून, या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागर...
पत्नीचा खून करून पळालेला आरोपी ५ तासांत जेरबंद; मुखेड पोलिसांची जलद कारवाई

पत्नीचा खून करून पळालेला आरोपी ५ तासांत जेरबंद; मुखेड पोलिसांची जलद कारवाई

क्राइम
मुखेड (प्रतिनिधी) पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या पाच तासांत अटक करत मुखेड पोलिसांनी तत्परतेचे उदाहरण सादर केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कर्णा (ता. मुखेड) येथील स्वाती खांडेकर या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना ६ एप्रिल रोजी सकाळी मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे पाठवण्यात आला. दरम्यान, मयत महिलेचा भाऊ योगेश देवकत्ते यांनी दिलेल्या तक्रारीत पती मारोती रामकिशन उर्फ बाबाराव खांडेकर (वय ३५) हा वारंवार पत्नीशी वाद घालत असल्याचे नमूद केले. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर आरोपीने साडीने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. मात्र पोलीस अधीक्षक अविनाश ...
error: Content is protected !!